Join us

... अन् तो चक्क रोहित शर्माच्या पाया पडला

एक चाहता मैदानात घुसला आणि रोहितकडे गेला. रोहितला या चाहत्याचा कोणताच अंदाज नव्हता, त्यामुळे सुरुवातीला रोहित घाबरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 16:32 IST

Open in App
ठळक मुद्देरोहित जेव्हा 21 धावांवर खेळत होता तेव्हा हा प्रकार मैदानात घडला.

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक चाहता थेट मैदानात घुसला होता. मैदानात घुसल्यावर या चाहत्याने थेट भारताचा कर्णधार विराट कोहलीला भेटला आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला होता. आता तर एक चाहता थेट मैदानात घुसला आणि त्याने रोहित शर्माबरोबर एक कृत्य केल्याचा प्रकार घडला आहे.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रोहितकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहितला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे रोहितने हा वेळ सत्कार्णी लावण्याचे ठरवले आणि विजय हजारे करंडकामध्ये मुंबईकडून खेळण्याचे ठरवले.

मुंबई आणि बिहार यांच्यातील सामना चांगलाच रंगात आला होता. रोहित शर्माने या सामन्यात नाबाद 33 धावांची खेळी साकारत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहित जेव्हा 21 धावांवर खेळत होता तेव्हा हा प्रकार मैदानात घडला.

एक षटक संपल्यावर रोहित आपल्या सहकाऱ्याला भेटायला जात होता. त्यावेळी एक चाहता मैदानात घुसला आणि रोहितकडे गेला. रोहितला या चाहत्याचा कोणताच अंदाज नव्हता, त्यामुळे सुरुवातीला रोहित घाबरला. तो चाहता थेट गेला आणि त्याने चक्क रोहितचे पाय धरले.

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीआशिया चषक