रिषभ पंतचाटी-20 क्रिकेटमधील अलीकडचा फॉर्म खूपच निराशाजनक आहे. राजकोटमध्ये शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात पंत १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. केशव महाराजच्या चेंडूवर पंतने ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर आपली विकेट गमावली. पंतने चेंडू सोडला असता तर कदाचित तो वाइड गेला असता.
आता भारतीय संघाचे महान माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी रिषभ पंतच्या शॉट निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वीही तो खराब शॉट्स खेळून अनेक वेळा बाद झाला आहे, त्यामुळे त्याच्यावर आता टीका होत आहे.
“त्यानं यापूर्वीच्या आपल्या तीन वेळा अशाप्रकारे बाद होण्यावरून शिकवण घेतली नाही. ते लोक वाईड चेंडू टाकतात ज्याला तो मारण्याचा प्रयत्न करतो आणि शॉट खेळताना पूर्णपणे ताकदही लावत नाही. त्यानं ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूंवर हवाई शॉट्य खेळणं टाळायला हवं,” असं सुनील गावस्कर म्हणाले. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्यांनी पंतच्या खेळीवर भाष्य केलं. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज आणि टेम्बा बावुमा केवळ ऑफ स्टंपबाहेर वाईड गोंलंदाजी करण्याची रणनिती आखतात आणि तुम्ही त्यात फसता असंही ते म्हणाले.
असा १० वेळा बाद
“२०२२ मध्ये टी २० क्रिकेटमध्ये त्याला १० वेळ ऑफ स्टंप बाहेरील चेंडूवर आऊट केलं गेलं. त्यातील काही चेंडू तो खेळला नसता तर ते वाईड असते. तो चेंडू स्टंपपासून खुप दूर होता. त्या चेंडूंपासून पंत खुप दूर उभा राहतो. त्यामुळे त्याला स्टंपच्या बाहेरील चेंडूंवर शॉट्स खेळण्यासाठी योग्य ताकद मिळत नाही,” असंही गावस्कर यांनी सांगितलं.
Web Title: He did not learn from mistakes former indian cricketer Sunil Gavaskar expressed anger at Rishabh Pant t20 cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.