Join us  

दिवसाला तो कमवायचा फक्त 35 रुपये, पण क्रिकेटने त्याचं आयुष्य बदलून टाकलं

एका फॅक्टरीमध्ये तो 35 रुपयांच्या रोजंदारीवर काम करायचा. पण त्याच्यामध्ये चांगली गुणवत्ता होती. ती एका व्यक्तीने हेरली. त्या खेळाडूला खेळण्याची संधी दिली आणि भारताच्या विश्वविजेत्या संघात त्याला खेळण्याची संधी मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 2:30 PM

Open in App
ठळक मुद्देटाईल्स बनवून झाल्यावर त्यांचे पॅकिंग करायचे तो काम करायचा.दिवसाला त्याला फक्त 35 रुपये मिळायचे.या 35 रुपयांमध्ये दोन वेळचे जेवणही नीट व्हायचे नाही.

मुंबई : कुणाच्या ललाटी सटवीने नेमकं काय लिहिलंय हे कुणालाही माहिती नसतं. एखाद्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येतात. पण जर तुमच्याकडे गुणवत्ता, जिद्द, चिकाटी ही त्रिसूत्री असेल तर तुम्ही जगावर राज्य करू शकता. असंच घडलंय भारताच्या एका क्रिकेटपटूबाबत. एका फॅक्टरीमध्ये तो 35 रुपयांच्या रोजंदारीवर काम करायचा. पण त्याच्यामध्ये चांगली गुणवत्ता होती. ती एका व्यक्तीने हेरली. त्या खेळाडूला खेळण्याची संधी दिली आणि भारताच्या विश्वविजेत्या संघात त्याला खेळण्याची संधी मिळाली.

एका टाइल्सच्या फॅक्टरीमध्ये तो खेळाडू काम करायचा. टाईल्स बनवून झाल्यावर त्यांचे पॅकिंग करायचे तो काम करायचा. दिवसाला त्याला फक्त 35 रुपये मिळायचे. या 35 रुपयांमध्ये दोन वेळचे जेवणही नीट व्हायचे नाही. या पगारात स्वत:ला व्यवस्थित जगता येत नाही तर कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा, हा प्रश्न त्याला पडला. नशिबाची चक्र फिरली. आणि तो मैदानात उतरल्यावर त्याने सर्वांचीच मने जिंकली. भारताच्या 2011च्या विश्वचषकाच्या संघातही तो होता. तो नेमका कोण, याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. तो म्हणजे भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज मुनाफ पटेल.

याबाबत मुनाफ म्हणाला की, " एक काळ असा होता की माझ्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. एका टाईल्स फॅक्टरीमध्ये मी काम करायचो. त्यावेळी दिवसाला 35 रुपये मिळायचे. एवढ्या कमी पगारात काहीच व्हायचे नाही. आता मी जो कुणी आहे तो फक्त क्रिकेटमुळेच. क्रिकेटने मला फक्त पैसा दिला नाही, तर ओळख दिली, मान-सन्मान मिळवून दिला. त्यामुळे मी क्रिकेटचा कायम ऋणी असेन. "

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ