नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांच्यातील मैत्री जगजाहीर आहे. माध्यमांशी संवाद साधताना देखील विराट कोहलीने धोनीचे अनेकदा कौतुक केले आहे. मी कर्णधारपद सोडले तेव्हा केवळ धोनीने मला फोन केला होता असे विराट कोहलीने आशिया चषकाच्या स्पर्धेत सांगितले होते. खरं तर धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेऊन 2 वर्षे झाली आहेत. मात्र तरीदेखील तो बाजारातील अव्वल ब्रँड्सच्या बाबतीत घराघरात पोहचला आहे.
खरं तर विराट कोहली देखील महेंद्रसिंग धोनीचा चाहता आहे, याचा प्रत्यय सोमवारी पाहायला मिळाला. 34 वर्षीय विराटला किन्ले पाण्याच्या बाटलीवर धोनीचा फोटो पाहायला मिळाला. कोहलीने या फोटोला आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. टी-20 विश्वचषकात अनेक विक्रम मोडल्यानंतर विराट कोहली सध्या विश्रांती घेत आहे. त्याने अलीकडेच उत्तराखंडमध्ये पत्नी अनुष्का शर्मासोबत मंदिरात भेट दिली.
"तो सगळीकडे आहे पाण्यातही"
सुट्टीचा आनंद घेत असलेल्या विराटने पाण्याच्या बाटलीवर एमएस धोनीचा फोटो पाहिला आणि इतका आनंद झाला की त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी टाकली. विराटने स्टोरी शेअर करताना लिहले, "तो सगळीकडे आहे, अगदी पाण्याच्या बाटलीवर @mahi7781." किंग कोहलीची ही स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
बांगलादेश दौऱ्यात दिसणार विराट
भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. तिथे टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या भारताचे नेतृत्व करणार आहे तर शिखर धवनकडे एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा असेल. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहलीला न्यूझीलंड मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहली थेट बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत दिसणार आहे.
बांगलादेशविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.
बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
भारताच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक
- 1 डिसेंबर - भारतीय संघ बांगलादेशला पोहचेल
- 4 डिसेंबर - पहिला एकदिवसीय सामना, ढाका
- 7 डिसेंबर - दुसरा एकदिवसीय सामना, ढाका
- 10 डिसेंबर - तिसरा एकदिवसीय सामना, ढाका
- 14-18 डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव
- 22-26 डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका
- 27 डिसेंबर - भारतीय संघ मायदेशी परतण्यासाठी रवाना होईल
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: He is everywhere, even in water, Virat Kohli shared an Instagram story of MS Dhoni's photo on a water bottle
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.