नवी दिल्ली : पराभवामुळे कर्णधाराचे पद काढून घेतल्याचे आतापर्यंत ऐकिवात होते. पण आळशीपणामुळे एखाद्या कर्णधाराला आपले पद गमाववे लागण्याची कदाचित पहिलीच वेळ पाहायला मिळाली आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. आशियाच चषकातील पराभवामुळे त्याची हकालपट्टी झाल्याचे वाटत होते. पण मॅथ्यूजच्या हकालपट्टीचे खरे कारण आता पुढे आले आहे. श्रीलंकेच्या प्रशिक्षकांनी मॅथ्यूजला का काढले, याचे कारण मीडियाला सांगितले आहे.
श्रीलंकेचे प्रशिक्षक चंडिका हतुरसिंघे यांनी सांगितले की, " आम्ही आशिया चषकातील दोन्ही सामने पराभूत झालो, म्हणून मॅथ्यूजची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आलेली नाही. पण धावा घेत असताना मॅथ्यूजने बराच आळशीपणा दाखवला. त्यामुळे संघाच्या धावा कमी झाल्या आणि अन्य फलंदाजांवर दडपण आले, त्यामुळे मॅथ्यूजला आम्ही कर्णधारपदावरून दूर केले आहे. "