Join us  

'त्याने महेंद्रसिंग धोनीचा विश्वास गमावला'; सुरेश रैनाला CSK नं संघात न घेतल्याचं खरं कारण, माजी खेळाडूचा दावा

इंडियन प्रीमिअर लीगच्या मेगा ऑक्शनमध्ये 'Mr. IPL' सुरेश रैना याला कोणत्याच संघाने ताफ्यात घेण्यास उत्सुकता दाखवली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 5:00 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या मेगा ऑक्शनमध्ये 'Mr. IPL' सुरेश रैना याला कोणत्याच संघाने ताफ्यात घेण्यास उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे किमान IPL 2022 मध्ये तरी सुरेश रैना ( Suresh Raina) खेळताना दिसणार नाही. पहिल्या फेरीत रैना अनसोल्ड राहिल्यानंतर नंतरच्या फेरीत किमान त्याला मुळ किंमतीत चेन्नई सुपर किंग्स ( CSK) संघात घेईल असे वाटले होते, परंतु तसे काहीच झाले नाही. CSKचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी रैना संघात फिट बसत नसल्याचे कारण सांगितले. पण, रैनाला CSK च्या ताफ्यात न घेण्यामागचे खरे कारण समोर वेगळेच असल्याचा दावा माजी क्रिकेटपटूने केला आहे. MS Dhoni व CSK चा विश्वास गमावला आणि त्यामुळेच रैनाला संघात घेतले गेले नाही, असा दावा न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू व समालोचक सायमन डौल ( Simon Doull ) यांनी केला आहे. 

सुरेश रैना व धोनी यांची घट्ट मैत्रीही जगाने पाहिली आहे. धोनीने २०२०मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला तेव्हा लगेचच रैनाने निवृत्ती जाहीर केली होती. टी-२०, वन डे आणि कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा भारताचा पहिला फलंदाज असलेल्या रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत. CSKकडून सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. 

आयपीएल २०२० दरम्यान सुरेश रैना CSK चा ताफा सोडून मायदेशी परतला होता. तेव्हा त्याने वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले होते आणि त्यानंतर त्यानं पुन्हा CSKच्या कॅम्पमध्ये सहभाग घेतला नाही. सायमन यांनी तो किस्सा सांगून यामुळेच रैनाचे फ्रँचायझी व धोनीसोबतच संबंध बिघडल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, असे दोन-तीन प्रसंग आहेत. ज्याच्यामुळे त्याने संघाचा विश्वास गमावला. असं नेमकं का घडलं याच्या खोलात जाण्याची गरज नाही, परंतु त्यावेळी अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे एकदा तुम्ही विश्वास गमावला की पुन्हा तुमचे स्वागत न होणे साहजिक आहे. ''

टॅग्स :सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनी
Open in App