मुंबई : 'एबी डिव्हिलियर्सने क्रिकेट निवृत्तीचा निर्णय व्हॉईस मेसेजने पाठवला होता. त्याचा तो व्हॉईस मेसेज ऐकून मोठा धक्का बसला आणि झोप उडालेली. तो मेसेज ऐकल्यानंतर खूप भावुक झालो होतो. कारण, त्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडूनही खेळणार नसल्याचे सांगितले होते,' अशी प्रतिक्रिया आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली याने दिली.
कोहलीने एका व्हिडीओमध्ये सांगितले की, 'एबीने जेव्हा खेळ सोडण्याचा निर्णय घेतला, तो क्षण मला चांगल्याप्रकारे लक्षात आहे. त्याने मला एक व्हॉईस मेसेज पाठवलेला आणि मला चांगलं लक्षात आहे की मी विश्वचषक स्पर्धेतून परतलो होतो. आम्ही दुबईत होतो आणि तेव्हा हा मेसेज मिळाला होता. अनुष्का माझ्यासोबत होती आणि यावर मला विश्वास बसत नसल्याचे मी तिला म्हटले होते.'
कोहली पुढे म्हणाला की, 'मला आधीपासूनच एबीच्या या निर्णयाचा अंदाज होता. याविषयी त्याने म्हटले की, 'गेल्या आयपीएल सत्रापासूनच मला एबीच्या या निर्णयाचा अंदाज आला होता. कारण, तो सातत्याने माझ्याशी याबाबत बोलत असे. तो नेहमी बोलायचा की, पुढे असंच कोणत्यातरी एका दिवशी तुझ्यासोबत कॉफीसाठी भेटायचे आहे.
त्यामुळे मी सातत्याने नर्व्हस होत होतो. काहीतरी घडणार असल्याची शंका होती. आम्ही सतत बोलायचो, पण तो निवृत्तीची गोष्ट टाळायचा. त्यामुळेच त्याचा मेसेज खूप भावनिक होता.'
...त्यावेळी एबीची कमतरता भासेल!
कोहली म्हणाला की, 'जर यंदा आरसीबीने जेतेपद पटकावले, तर मी खूप भावुक होईन आणि सर्वात आधी मला एबीची आठवण येईल. त्याच्यासाठी हे जेतेपद खूप महत्त्वाचे ठरेल. एबी अत्यंत खास व्यक्ती आहे. माझ्या मते असा एकही व्यक्ती नसेल, ज्याच्या आयुष्यात एबीचा प्रभाव पडला नसेल.'
Web Title: He sent me a voice note, I got very emotional Virat Kohli on how AB de Villiers' told him he was done playing for RCB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.