ठळक मुद्देभारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने यशाचे रहस्य उलगडले
कोलंबो : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकांमध्ये कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी नेत्रदीपक कामगिरी करत भारताला यश मिळवून दिले होते. या मालिकेच्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या सुचनांचा मला फायदा झाला, असे कुलदीप यादवने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. पण या यशाचे पूर्ण रहस्य कुलदीपने आज उलगडले. आम्हाला सूचना देणारा, मार्गदर्शन करणारा धनी वेगळा आहे आणि हे सारे करवून घेणारा धनी वेगळा आहे, असा खुलासाकुलदीपने आज केला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतील यशामध्ये धोनीने दिलेल्या सुचनांचा अमुल्य वाटा आहे, असे कुलदीपने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. पण आज त्याने जो खुलासा केला त्यामुळे संघात कुणाची आणि कशी युती आहे, हे स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वी भारताच्या काही माजी कर्णधारांनी धोनीच्या अनुभवाविषयी वक्तव्य केली होती. धोनीचा अनुभव हा संघातील युवा खेळाडूंसाठी फार मोलाचा ठरेल, असे या माजी क्रिकेटपटूंनी सांगितले होते. सुरुवातीला कुलदीपनेही, यापद्धतीचे वक्तव्य केले होते. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच मी खेळणार होतो. त्यामुळे खेळपट्टी आणि वातावरण कसे असेल, याची मला कल्पना नव्हती. पण धोनीने मला योग्य मार्गदर्शन केले, असे म्हटले होते. पण माजी कर्णधारांच्या वक्तव्यानंतर मात्र कुलदीपने आपल्या यशाचे श्रेय धोनीबरोबर कर्णधार विराट कोहलीलाही दिल्याचे दिसत आहे.
धोनी हा नेहमीच आमच्या सारख्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतो. पण धोनीने सांगितलेल्या गोष्टी अमंलात आणायचे असेल तर त्यासाठी कोहलीची मदत होते. कोहलीने आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. धोनीने सांगितलेल्या सूचनांची योग्य अमंलबजावणी करण्यासाठी आम्हाला कोहलीची मदत मिळते. धोनी आणि कोहली यांच्यामध्ये असलेल्या युतीचा फायदा संघाला होत आहे, असे कुलदीप म्हणाला.
आपल्या या मुलाखतीमध्ये कुलदीपने कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. तो कोहलीबद्दल म्हणाला की, संघाचे नेतृत्व आदर्शवत कसे असावे, याचे कोहली हा मूर्तीमंत उदाहरण आहे. तो मैदानात आक्रमक असला तरी आमच्याशी बोलत असताना तो फारच शांत असतो. तो कोणत्याही क्षणी सामना सोडत नाही. त्याच्या वागण्यामुळे संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावतो.
Web Title: He speaks differently and differently.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.