Join us  

रिषभ क्रिकेटच्या सर्व प्रकारातील महान क्रिकेटपटू होईल; गांगुलीचं मोठं विधान

India vs England, Rishabh Pant Century: बीसीसीआयचा अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं रिषभचं केलेलं कौतुक सर्वात महत्वाचं ठरलं आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 9:07 PM

Open in App

अहमदाबाद कसोटीत भारताचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनं दमदार कामगिरी केली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ अडचणीत असताना रिषभनं मैदानात टिच्चून फलंदाजी केली आणि शतकी खेळी साकारली. रिषभनं वॉशिंग्टन सुंदरच्या साथीनं भारतीय संघाला डावाला आकार दिला आणि भारताला आघाडी मिळवून दिलं. रिषभच्या धडाकेबाज खेळीचं भारताच्या माजी खेळाडूंनी तोंडभरुन कौतुक केलं. पण यात बीसीसीआयचा अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं केलेलं कौतुक सर्वात महत्वाचं ठरलं आहे. (India vs England Sourav Ganguly Big Prediction For Rishabh Pant)

रिषभ पंतला याआधीही सौरव गांगुलीनं भारताचं भविष्य असल्याचं म्हटलं होतं. पण आजच्या शतकी खेळीनं गांगुली खूप प्रभावित झाला आहे. "येत्या काळात रिषभ क्रिकेटच्या सर्व प्रकारातील महान क्रिकेटपटू होईल", अशी भविष्यवाणी गांगुलीनं केली आहे. रिषभच्या आजच्या खेळीनंतर गांगुलीनं एक ट्विट केलं आहे. 

"रिषभ किती जबरदस्त खेळाडू आहे. दबावाच्या परिस्थितीत खेळलेली रिषभची शतकी खेळी अविश्वसनीय आहे. त्यानं हे काही पहिल्यांदा केलेलं नाही आणि शेवटचं देखील नाही. येत्या काळात रिषभ क्रिकेटच्या सर्व प्रकारातील महान खेळाडू होईल. असाच आक्रमक पद्धतीनं फलंदाजी करत राहा. तो असाच मॅच विनर आणि विशेष खेळाडू म्हणून ओळखला जाईल", अशा आशयाचं ट्विट सौरव गांगुलीनं केलं आहे. 

सेहवागचं हटके ट्विटभारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवानंही नेहमीप्रमाणे हटके अंदाजात रिषभच्या फलंदाजीचं कौतुक केलंय. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर रिषभ पंतनं लगावलेल्या रिव्हर्स स्वीपवर आणि षटकार ठोकून साजरं केलेलं शतक यावर सेहवागनं मजेशीर ट्विट केलंय. 

व्हीव्हीएस लक्ष्मण यांही पंत-सुंदर जोडीचं केलं कौतुकभारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी रिषभ पंतसह वॉशिंग्टन सुंदरचंही कौतुक केलं आहे. भारताचे दोन युवा फलंदाज आज पुन्हा एकदा मैदानात उभं राहून संघाला सावरत आहेत हे पाहून खूप आनंद झाला. संघासाठी चमकदार कामगिरी करण्याची एकही संधी दोघंही दवडू देत नाहीत, असं ट्विट लक्ष्मण यांनी केलं आहे.

 

टॅग्स :रिषभ पंतसौरभ गांगुलीभारत विरुद्ध इंग्लंडनरेंद्र मोदी स्टेडियम