मुंबई : परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरवरील सुनावणी आता २० मे रोजी होणार आहे. ही सुनावणी १४ मे रोजी करण्यात येणार होती, पण ती काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
सचिन हा बीसीसीआयच्या क्रिकेट सुधारणा समितीमध्ये आहे. त्याचबरोबर सचिन आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा आयकॉन आहे. या दोन्ही पदे एकाच वेळी सांभाळणे म्हणजे परस्पर हितसंबंद जपल्यासारखे आहे, असे बीसीसीआयने सचिनला कळवले होते. यावर सचिनने, " मला मुंबई इंडियन्सकडून कोणतेही मानधन मिळत नाही. हे फक्त मानद पद आहे," असे मत व्यक्त केले होते. सचिनबरोबरच या प्रकणात सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनाही बीसीसीआयने नोटीस पाठवली होती.
सचिनची काय होत प्रतिक्रीया
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने हितसंबंध जोपासण्याच्या मुद्यावर बीसीसीआयतर्फे ‘समाधानकार’असल्याचे उत्तर फेटाळून लावताना सध्याच्या स्थितीसाठी बीसीसीआय जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
तेंडुलकरने या प्रकरणात बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांना १३ मुद्यावर आपले उत्तर दिले आहे. त्यात सचिनने निवेदन केले की, प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना पाचारण करीत या प्रकरणावर त्यांनी मत मांडावे, असे म्हटले आहे.
तेंडुलकरने १०, ११ व्या आणि १२ व्या मुद्यामध्ये कडवी प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘कुठल्याही पक्षपाताशिवाय नोटीस मिळाल्यानंतर (तेंडुलकर) आश्चर्य वाटते. त्याला सीएसी सदस्य करण्याचा निर्णय बीसीसीआयचा होता. आता ते याला हित जोपासण्याचा मुद्दा असल्याचे म्हणत आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तीला निवृत्तीनंतर (आयपीएलमधून) २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सचे आयकॉनपद बहाल करण्यात आले. हे पद सीएसी (२०१५) अस्तित्वात येण्यापूर्वीचे आहे.
तिघांनीही मुद्दा फेटाळला
सचिन क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यपदासह मुंबई इंडियन्स आयकॉन असल्यामुळे दुहेरी भूमिका बजावत आहे. त्यात हितसंबंध जोपासण्याचा मुद्दा उपस्थित होतो. सीएसीचे तीन सदस्य तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बोर्डाचे लोकपाल व नैतिक अधिकारी डी.के. जैन यांनी नोटीस बजावली आहे. या तिघांनी आपली बाजू मांडताना हित जोपासण्याचा मुद्दा फेटाळून लावला आहे.
Web Title: Hearing on Sachin Tendulkar's 'That' case on Monday
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.