हार्दिककडे क्रिकेटचे स्वत:चे पुस्तक

आयपीएलमध्ये प्रत्येकाची नजर मोठे फटके खेळणाऱ्या फलंदाजावर केंद्रित असताना माझे लक्ष अखेरच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजीला नवी दिशा देणा-या काही फलंदाजांनी वेधले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 05:58 AM2019-05-05T05:58:43+5:302019-05-05T05:59:13+5:30

whatsapp join usJoin us
 Hearty cricket's own book | हार्दिककडे क्रिकेटचे स्वत:चे पुस्तक

हार्दिककडे क्रिकेटचे स्वत:चे पुस्तक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- हर्षा भोगले 

आयपीएलमध्ये प्रत्येकाची नजर मोठे फटके खेळणाऱ्या फलंदाजावर केंद्रित असताना माझे लक्ष अखेरच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजीला नवी दिशा देणा-या काही फलंदाजांनी वेधले आहे. गेल्या आयपीएलच्या तुलनेत यावेळी हे खेळाडू अखेरच्या तीन षटकांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा फटकाविण्यात दोनदा यशस्वी ठरले आहेत आणि असे केवळ स्टार खेळाडूंमुळे शक्य झालेले नाही. प्रत्येक संघात अशी कामगिरी करण्यासाठी सहायक फलंदाज आहेत.

पण, ज्यावेळी हार्दिक पांड्या फलंदाजी करीत असतो त्यावेळी मी माझे काम थांबवतो. त्याच्या बॅटवर आलेला चेंडू असा जातो की जसे कुठले इंजिन लागलेले आहे. तुम्ही असे अन्य फलंदाजांबाबतही बोलू शकता, विशेषत: आंद्रे रसेलसाठी. तो कोलकाता संघातर्फे अशी भूमिका बजावतो. रसेल चेंडूवर आक्रमक फटका मारतो, तर हार्दिकच्या फलंदाजीमध्ये सहजता दिसून येते. रसेल फटका मारताना आपल्या शरीराला झोकून देतो. तो षट्कार लगावतो त्यावेळी त्याची बॅट म्हणजे कुºहाड भासते आणि तो जंगलतोड करण्याच्या मिशनवर असल्याची प्रचिती येते. यंदाच्या आयपीएलमध्ये अन्य फलंदाजांच्या तुलनेत रसेलला रोखण्यासाठी रणनीती तयार करताना संघांचा बराच वेळ खर्च झाला आहे.

रसेलबाबत आदर आहे, पण हार्दिक त्याच्या तुलनेत सडपातळ आहे, पण तो आकर्षक फटके खेळताना दिसतो. असे वाटते की हेलिकॉप्टर शॉटला आणखी एक बॅट मिळाल्याचे निदर्शनास येते. हा धोनीच्या फटक्याच्या तुलनेत वेगळा आहे. यंदाच्या मोसमात फिरकीपटूंविरुद्ध अन्य फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही.

हार्दिकला आपल्या विशेष क्षमतेवर लक्ष केंद्रित करीत आगेकूच करायची आहे. जर त्याने कामगिरीत सातत्य राखले तर तो यशाचे नवे शिखर गाठेल. क्रिकेटचे स्वत:चे पुस्तक असलेला तो दुर्मीळ खेळाडू आहे; पण त्याला मिळालेले यश त्याने निवडलेल्या पर्यायांवर अवलंबून राहील.

Web Title:  Hearty cricket's own book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.