Gay Cricketer:'हा' माजी क्रिकेटर तृतीयपंथी असल्याचे उघड; तब्बल २० वर्षांनंतर केला मोठा खुलासा 

क्रिकेट विश्वातील अनेक महिला खेळाडूंनी आपण तृतीयपंथी असल्याचा खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 03:07 PM2022-08-02T15:07:19+5:302022-08-02T15:09:44+5:30

whatsapp join usJoin us
Heath Davies has become the first gay male cricketer after Steven Davies | Gay Cricketer:'हा' माजी क्रिकेटर तृतीयपंथी असल्याचे उघड; तब्बल २० वर्षांनंतर केला मोठा खुलासा 

Gay Cricketer:'हा' माजी क्रिकेटर तृतीयपंथी असल्याचे उघड; तब्बल २० वर्षांनंतर केला मोठा खुलासा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातील अनेक महिला खेळाडूंनी आपण तृतीयपंथी असल्याचा खुलासा केला आहे. ही बाब सांगण्यासाठी धाडसी असली तरी त्यांनी सार्वजनिकपणे याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र पुरूष क्रिकेटसाठी ही गोष्ट सामान्य नाही. आतापर्यंत सार्वजनिकपणे याचा खुलासा फक्त दोन क्रिकेटपटूंनी केला असून आता पुन्हा एकदा या प्रकरणाने तोंड वर काढले आहे.  

सर्वप्रथम इंग्लंडचा माजी विकेटकिपर फलंदाज स्टीव्हन डेव्हाइसने (Steven Davies) याबाबत खुलासा केला होता. त्याने २०११ च्या सुरूवातीला सांगितले होते की, तो गे म्हणजेच तृतीयपंथी आहे. स्टीव्हनने केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. त्याने हे जाहीर करताच तो पुरूष आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पहिला असा खेळाडू बनला होता, ज्याने जाहीरपणे आपण तृतीयपंथी असल्याचे मान्य केले होते. 

हेथ डेव्हिस न्यूझीलंडचा पहिला तृतीयपंथी क्रिकेटर  
दरम्यान, आता इंग्लंडच्या खेळाडूच्या नावासमोर आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. आता न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटरने देखील याबाबत खुलासा केला आहे. हेथ डेव्हिस (Heath Davies) पुरूष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा तृतीयपंथी क्रिकेटर ठरला आहे. त्याने जाहीरपणे ही गोष्ट मान्य केली असून तो न्यूझीलंडचा पहिला तृतीयपंथी क्रिकेटर असल्याचे उघड झाले आहे. हेथ डेव्हिसने आपल्या वयाची पन्नाशी पार केल्यानंतर या गोष्टीचा खुलासा केला आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून तो न्यूझीलंडच्या संघाचा महत्त्वाचा चेहरा होता, ज्याने किवीच्या संघासाठी ५ कसोटी आणि ११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. हेथ डेव्हिसने हे सर्व सामने १९९४ ते १९९७ या कालावधीत खेळले होते. 

"मी तृतीयपंथी असल्याचे सगळ्यांना माहित होते"
हेथ डेव्हिस सध्या ऑस्ट्रेलियात राहत असून त्याने एक ऑनलाइन मॅगनीज द स्पिन ऑफशी बोलताना म्हटले, "मला वाटते की हा माझ्याच जीवनाचा एक भाग आहे, ज्याला मी आतापर्यंत सगळ्यांपासून लपवत आलो होतो. यामध्ये खूप अडचणी आहेत, ज्यामुळे मला माझ्या जीवनापासून खरोखर वेगळे व्हायचे होते. मी एकटाच होतो मी दबावात असल्यामुळे मला तृतीयपंथी म्हणून जगणे असहाय्य झाले होते." 

"त्यामुळे मला आता वाटते की मी माझ्या जीवनाबद्दल खुलासा करणे गरजेचे आहे, ज्याला मी आतापर्यंत लपवत आलो होतो. ऑकलंडमधील प्रत्येकाला ही गोष्ट माहिती होती की मी तृतीयपंथी आहे याशिवाय संघातील खेळाडूंना देखील याबात कल्पना होती. मात्र तेव्हा हा मोठा मुद्दा वाटत नव्हता. मी सर्वत्र मोकळेपणाने वावरत होतो", असे हेथ डेव्हिसने अधिक म्हटले. 

 


 

Web Title: Heath Davies has become the first gay male cricketer after Steven Davies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.