इंडियन प्रीमिअर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद संघातील स्फोटक फलंदाज हेनरिच क्लासेन ( Heinrich Klaasen ) याने मेजर लीग क्रिकेटमध्ये ( Major League Cricket) मंगळवारी विक्रमाला गवसणी घातली. Major League Cricket मध्ये शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२०, इंडियन प्रीमिअर लीग आणि आता MLC मध्ये क्लासेनने शतकी खेळी केली. MLC मध्ये तो Seattle Orcas संघाकडून खेळतोय आणि त्याने मुंबई इंडियन्स न्यू यॉर्कच्या गोलंदाजांची धुलाई केली.
१९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नौमान अन्वरने ३० चेंडूंत ५१ धावा चोपल्या, परंतु क्विंटन डी कॉक ( ९) व शेहान जयसुर्या ( ०) हे स्वस्तात बाद झाले. ट्रेंट बोल्टने Seattle Orcas च्या फलंदाजांना तंबूत पाठवण्याचे सत्र सुरू ठेवले. कर्णधार दासून शनाकाही १० धावांवर बाद झाला. अशा परिस्थितीत क्लासेन एकटा भिडला अन् त्याने ४४ चेंडूंत ९ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ११० धावा कुटल्या. त्याने १९.२ षटकांत संघाला विजय मिळवून दिल्या. Seattle Orcas च्या ८ बाद १९५ धावा झाल्या. बोल्टने ४ विकेट्स घेतल्या, तर राशीद खानने २ बळी टिपले.