आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी

Longest Six Of IPL 2025: मुंबईविरुद्धच्या सामन्यात हेनरिक क्लासेनने आयपीएल २०२५ मधील सर्वात लांब षटकार मारला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 17:57 IST2025-04-24T17:52:36+5:302025-04-24T17:57:27+5:30

whatsapp join usJoin us
Heinrich Klaasen Dismantles Puthur; Records Longest Six Of IPL 2025 | आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी

आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्सविरुद्ध बुधवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात हैदराबादचा तडाखेबाज फलंदाज हेनरिक क्लासेनने खास विक्रमाला गवसणी घातली. हैदराबादचा संघ डगमगत असताना हेनरिक क्लासेनने ७१ धावांची तुफानी खेळी केली, ज्यात नऊ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. यातील एका षटकारने सर्व विक्रम मोडून काढले. या सामन्यात हेनरिक क्लासेनने मारलेला एक षटकार आयपीएल २०२५ मधील सर्वात लांब षटकार ठरला आहे. 

मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ विकेट्स गमावली. अवघ्या ३५ धावांवर हैदराबादचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये परतला. संघ अडचणीत असताना हेनरिक क्लासेनने महत्त्वाची खेळी केली. दरम्यान, हैदराबादच्या डावातील दहाव्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्याने चेंडू विग्नेश पुथूर याच्याकडे सोपवला. या षटकातील पहिलाच चेंडू विग्नेशने शॉर्ट बॉल टाकला. या चेंडूवर क्लासेनने मोठा फटका मारून चेंडू १०७ मीटर लांब पाठवला. या षटकारासह तो आयपीलएल २०२५ मध्ये सर्वात लांब षटकार मारणारा फलंदाज ठरला. 

आयपीएल २०२५ मध्ये सर्वात लांब षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानवर आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फिल सॉल्ट तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर ट्रेव्हिस हेड चौथ्य, निकोलस पूरन पाचव्या, अनिकेत वर्मा सहाव्या, टीम डेव्हिड सातव्या, ट्रिस्टन स्टब्स आठव्या, निकोलस पूरन नवव्या आणि शेरफेन रूदरफोर्ड दहाव्या स्थानावर आहे.

आयपीएल २०२५: सर्वात लांब षटकार मारणारे फलंदाज

१) हेनरिक क्लासेन- १०७ मीटर
२) अभिषेक शर्मा- १०६ मीटर
३) फिल सॉल्ट- १०५ मीटर
४) ट्रेव्हिस हेड- १०५ मीटर
५) निकोलस पूरन- १०२ मीटर
६) अनिकेत वर्मा- १०२ मीटर 
७) टीम डेव्हिड- १०० मीटर
८) ट्रिस्टन स्टब्स - ९८ मीटर
९) निकोलस पूरन- ९७ मीटर
१०) शेरफेन रूदरफोर्ड

Web Title: Heinrich Klaasen Dismantles Puthur; Records Longest Six Of IPL 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.