नवी दिल्ली : 1 डिसेंबरपासून पाकिस्तानच्या धरतीवर इंग्लंड आणि पाकिस्तान (PAK vs ENG) यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा कसोटी संघ आगामी मालिकेसाठी रविवारी पहाटे इस्लामाबादला पोहोचला, जिथे त्यांना बाबर आझमच्या पाकिस्तान संघाशी सामना करायचा आहे. इंग्लंड क्रिकेटने आपल्या विविध सोशल मीडिया हँडल्सवर इस्लामाबाद विमानतळावरील संघाच्या आगमनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आमचा कसोटी संघ पाकिस्तानला पोहोचला, अशा आशयाचे कॅप्शन इंग्लिश बोर्डाने दिले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेच्या तयारीसाठी इंग्लंडच्या कसोटी संघाने अबुधाबीमध्ये वेळ घालवला होता.
दरम्यान, इंग्लंडचा संघ तब्बल १७ वर्षांनंतर पाकिस्तानच्या धरतीवर कसोटी मालिका खेळणार आहे. त्यांनी २००५ मध्ये पाकिस्तानमध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली आणि तीन सामन्यांची मालिका २-० ने गमावली. इंग्लंडने या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येथे सात सामन्यांची टी-२० मालिका खेळली आणि ४-३ ने विजय मिळवून यजमान संघाला पराभवाची धूळ चारली.
खरं तर इंग्लिश संघ मागील वर्षीच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होता. पण सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने रावळपिंडीतील पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्यापूर्वी त्यांचा दौरा रद्द केला. या महिन्याच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान आणि १९९२ च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार इम्रान खान यांच्या हत्येच्या प्रयत्नानंतर, रावळपिंडीतून पहिली कसोटी हलवण्याची संभावना आहे.
३ सामन्यांचा रंगणार थरार
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या चक्राचा भाग आहेत. पहिला सामना रावळपिंडी येथे १ ते ५ डिसेंबर, दुसरा सामना मुल्तान येथे ९ ते १३ डिसेंबर आणि शेवटचा सामना कराची येथे १७ ते २१ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हे तीन कसोटी सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्रातील इंग्लंडचे शेवटचे सामने असतील.
इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, अब्दुला शफिक, अबरार अहमद, अझहर अली, फहीम अशरफ, हारिस रौफ, इमाम उल हक, मोहम्मद अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, नौमान अली, सलमान अली आगा, सरफराज अहमद, सऊद शकील, शान मसूद आणि झाहिद महमूद.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Hello Pakistan, Ben Stokes' message for pakistan as England land on Pakistani soil amid heavy security
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.