Join us  

"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'

चेंडू 'हेल्मेट'ला लागल्यावर LBW विकेट कशी मिळेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 2:41 PM

Open in App

India vs Bangladesh, 2nd Test :  कानपूरच्या ग्रीन पार्कच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खराब वातावरणामुळे व्यत्यय निर्माण झाल्याचा सीन पाहायाला मिळत आहे. तासभर उशीरा सुरु झालेल्या सामन्यात लंच वेळी पावसाच्या सरी आल्या. त्यानंतर सामना सुरु झाला, पण बांगलादेशच्या डावातील ३५ षटकानंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्याची वेळ आली. खेळ थांबला त्यावेळी बांगलादेशच्या संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात १०७ धावा केल्या होत्या. मोमीनुल हक (Mominul Haque) ८१ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने ४० धावांवर खेळत होता तर दुसरीकडे मुश्तीफिकर रहिम (Mushfiqur Rahim) १३ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ६ धावांवर खेळत होता. 

"हेल्मेट से LBW ले सकते है"  पंतची 'बडबड' स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड

अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्याआधी बांगलादेशच्या डावातील ३३ व्या षटकात आर. अश्विन गोलंदाजी करत होता. त्यावेळी विकेटमागून रिषभ पंतची कॉमेंट्री स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाली आहे. बांगलादेशचा डावखुरा फलंदाज मोमीनुल बॅटिंग करत असताना पंतची आपल्या नेहमीच्या अंदाजात बडबड सुरु होती. यावेळी तो "हेल्मेट से LBW ले सकते है" असं म्हणताना दिसून आले. एवढेच नाही तर मेहनत केल्याशिवाय काही मिळणार नाही भावानों, या आशयाच्या शब्दांसह तो संघातील गोलंदाज आणि अन्य सहकाऱ्यांना प्रोत्साहित करतानाही दिसून आले. बांगलादेशच्या कॅप्टनची अश्विनला जी विकेट मिळाली त्यातही पंतच्या बोलंदाजीचं कनेक्शन होतं. "एश भाई हलका सा थोडा आगे डालना पडेगा" अशी टिप्स पंतनं दिली अन् बांगलादेशचा कॅप्टन अश्विनच्या गळाला लागला. 

 

चेंडू 'हेल्मेट'ला लागल्यावर LBW विकेट कशी मिळेल?

रिषभ पंतची ही कॉमेंट्री ऐकणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना हेल्मेटला लागून LBW ची विकेट कशी मिळेल? असा प्रश्न पडू शकतो.  कारण LBW विकेट ही चेंडू पॅडला लागल्यावर दिली जाते, हे सर्वांनाच माहिती आहे. पण पंत अजिबात चुकीचा नव्हता. त्याची बडबड उगाच नव्हती. कारण क्रिकेटमधील LBW च्या नियमानुसार, खांद्याच्या वरच्या भागाला चेंडू लागला तरी पंच एखाद्या खेळाडूला LBW च्या रुपात बाद ठरवू शकतो. अश्विनच्या गोलंदाजीवर मोमीनुल हक हा पॅडल स्विप शॉट खेळताना दिसले. त्याची उंचीही कमी आहे. त्यामुळेच कदाचित पंतनं  हेल्मेटला लागूनही LBW च्या रुपात विकेट मिळू शकते, असं म्हटलं. 

क्रिकेटचा देवावर आली होती 'ती' वेळ

१९९९ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील एडलेड कसोटी सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला खांद्याला चेंडू लागल्यावर LBW आउट  देण्यात आले होते. ऑस्ट्रेलियन अंपायर डेरियल हार्पर यांनी दिलेला हा निर्णय वादग्रस्तही ठरला होता. ग्लेन मॅकग्रा याने बॅक टू बॅक तीन चेंडू बाउन्सर मारल्यावर त्याचा एक चेंडू खाली राहिला. सचिन तेंडुलकरने तो सोडण्याचा प्रयत्न केला आणि अंपायरच्या नजरेत सचिन विकेटसमोर होता.  

 

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघबांगलादेशआर अश्विन