ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी ते सचिन तेंडुलकरपर्यंत सर्वच खेळाडू पुढे आले आहेत. त्यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. पण, या क्रिकेटपटूनं आर्थिक मदत करण्यासाठी वर्ल्ड कप विजेत्या संघाची जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडनं गतवर्षी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जेतेपदाचा मान पटकावला. त्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलरनं त्याच्या जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉर्ड्सवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला सुपर ओव्हरमध्येही विजय मिळवता आला नाही. सर्वाधिक चौकाराच्या नियमानं इंग्लंडला विजेता जाहीर केले. या ऐतिहासिक क्षणाची जार्सी आता बटलर लिलावात ठेवणार आहे. त्यानं लिहिलं की,''रॉयल ब्रॉम्प्टन आणि हॅरफिल्ड हॉस्पिटलच्या चॅरिटीसाठी वर्ल्ड कप अंतिम सामन्याच्या अंतिम सामन्यातील जर्सी लिलावात ठेवणार आहे. गत आठवड्यात या हॉस्पिटल्सनी मदतीचं आवाहन केलं होतं.''
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 22400 कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि 1412जणांचा मृत्यू झाला आहे.
अऩ्य महत्त्वाच्या बातम्या
Corona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला
इंग्लंड क्रिकेट बोर्डानं उघडला खजिना; केली 570 कोटींची मदत
तुमची लाज वाटते... युवराज सिंग अन् भज्जीवर भडकले नेटीझन्स
मजहब नहीं सिखाता बैर करना... शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन समाजाला मदत
सुरेश रैनाच्या मदतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'Brilliant' रिप्लाय...
रस्त्यावर उतरून गरिबांना मदत करतोय क्रिकेटपटू; घेतली 200 कुटुंबांची जबाबदारी