Indian team for the T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बुधवारी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आर अश्विनची ( R Ashwin) निवड ही सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरली. इंग्लंड दौऱ्यावर ज्या अश्विनला चार कसोटीत बाकावर बसवून ठेवले, त्यालाच थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान दिले गेले. आर अश्विन २०१७मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) टीम इंडियाला मार्गदर्शन करणार आहे. तो मेंटर म्हणून भारतीय संघासोबत असणार आहे. त्यामुळे २०१९च्या वन डे वर्ल्ड कपनंतर विराट कोहली, रोहित शर्मा व महेंद्रसिंग धोनी हे त्रिकुट पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. ( Virat Kohli, Rohit Sharma and MS Dhoni will reunite at the T20 World Cup for the first time since 2019 World Cup semi finals)
- आघाडीची फळी - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल
- मधली फळी - सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन
- अष्टपैलू खेळाडू - हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल
- फिरकीपटू - राहुल चहर, आर अश्विन, वरुण चक्रवर्थी
- जलदगती गोलंदाज - जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
- राखीव खेळाडू - शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, दीपक चहर
- संघात स्थान न मिळालेले खेळाडू - पृथ्वी शॉ, शिखर धवन, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर
- २४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
- ३१ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
- ३ नोव्हेंबर - भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
- ५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
- ८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता
- उपांत्य फेरीचे सामने -१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर
- अंतिम सामना - १४ नोव्हेंबर