India's fixtures at the T20 World Cup : Team India अखेरच्या दोन सामन्यांत कोणाला भिडणार, झाले स्पष्ट; जाणून घ्या विराट अँड कंपनीचे संपूर्ण वेळापत्रक

India's fixtures at the T20 World Cup : विराट कोहली ( Virat Kohli) या स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे आणि त्यामुळे त्याला जेतेपदाची भेट देण्याचा सहकाऱ्यांचा प्रयत्न असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 07:34 PM2021-10-22T19:34:40+5:302021-10-22T19:35:36+5:30

whatsapp join usJoin us
Here are India's fixtures at the T20 World Cup : Group stage schedule & squad; key players, strongest starting XI | India's fixtures at the T20 World Cup : Team India अखेरच्या दोन सामन्यांत कोणाला भिडणार, झाले स्पष्ट; जाणून घ्या विराट अँड कंपनीचे संपूर्ण वेळापत्रक

India's fixtures at the T20 World Cup : Team India अखेरच्या दोन सामन्यांत कोणाला भिडणार, झाले स्पष्ट; जाणून घ्या विराट अँड कंपनीचे संपूर्ण वेळापत्रक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Here are India's fixtures at the T20 World Cup : २००७मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली टीम इंडियानं  पहिलावहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर १४ वर्षांनी विराट कोहली अँड कंपनी हाच पराक्रम पुन्हा करण्यासाठी सज्ज झाली आहे. २०१६नंतर प्रथमच होत असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले आहे. बीसीसीआयच्या यजमानपदाखाली यूएई व ओमान येथे ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. भारताचा पहिलाच मुकाबला २४ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्याशी होणार आहे. 

२०१६मध्ये भारताला उपांत्य फेरीत हार मानावी लागली होती, परंतु यावेळी जेतेपद पटकावण्याचा निर्धार टीम इंडियाचा आहे. विराट कोहली ( Virat Kohli) या स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे आणि त्यामुळे त्याला जेतेपदाची भेट देण्याचा सहकाऱ्यांचा प्रयत्न असेल. कोहलीव्यतिरिक्त रोहित शर्मा, लोकेश राहुल यांच्या कामगिरीवरही साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सूर्युकमार यादव, इशान किशन, रिषभ पंत यांच्याकडे टीम इंडियाचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. आर अश्विनही चार वर्षांनी ट्वेंटी-२० संघात परतला आहे आणि त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षाही भरपूर आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार हे त्रिकुट टीम इंडियासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

नामिबियानं आज आयर्लंडवर ८ विकेट्स राखून विजय मिळवताना Round 1 मधील ग्रूप अ मधील दुसरे स्थान पक्के केले आणि त्यामुळे आता त्यांना Super 12 मध्ये टीम इंडियाचा सामना करावा लागणार आहे. ग्रुप ब मध्ये स्कॉटलंडनं अव्वल स्थान निश्चित केले आहे.  ( India will face Scotland on November 5 and Namibia on November 8 in 2021 T20 World Cup)

टीम इंडियाचे वेळापत्रक ( India's schedule at T20 World Cup)

  • भारत वि. पाकिस्तान, दुबई - २४ ऑक्टोबर - सायंकाळी ७.३० वाजल्यापासून 
  • भारत वि. न्यूझीलंड, दुबई - ३१ ऑक्टोबर - सायंकाळी ७.३० वाजल्यापासून 
  • भारत वि. अफगाणिस्तान, अबु धाबी  - ३ नोव्हेंबर - सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
  • भारत वि. स्टॉटलंड, दुबई - ५ नोव्हेंबर - सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
  • भारत वि. नामिबिया, दुबई - ८ नोव्हेंबर - सायंकाळी ७.३० वाजल्यापासून

 

भारताचे तगडे ११ शिलेदार - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव,  रिषभ पंत, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्थी 

भारताचा १५ सदस्यीय संघ ( India’s 15-man squad) - विराट कोहली , रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर 

Web Title: Here are India's fixtures at the T20 World Cup : Group stage schedule & squad; key players, strongest starting XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.