IPL 2023 : डेव्हिड वॉर्नर सांभाळणार दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद, अक्षर पटेलकडेही सोपवली मोठी जबाबदारी

IPL 2023, DC Captain : भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याला अपघातामुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:25 AM2023-03-16T10:25:32+5:302023-03-16T10:28:08+5:30

whatsapp join usJoin us
Here comes an announcement by Delhi Capitals: David Warner named captain, Axar Patel vice-captain, Sourav Ganguly named the director of cricket. | IPL 2023 : डेव्हिड वॉर्नर सांभाळणार दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद, अक्षर पटेलकडेही सोपवली मोठी जबाबदारी

IPL 2023 : डेव्हिड वॉर्नर सांभाळणार दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद, अक्षर पटेलकडेही सोपवली मोठी जबाबदारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, DC Captain : भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याला अपघातामुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या पर्वात (  IPL 2023) तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार नसल्याचे आधीच स्पष्ट केला. त्यामुळे आयपीएल २०२३मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श आदी नावं या शर्यतीत आघाडीवर होते आणि अखेर कर्णधार कोण हे निश्चित झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या वर्षात संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्याकडे सोपवण्याचा निर्णय जाहीर केला. 


ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) हा रिषभच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आहे. अक्षर पटेलकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत वॉर्नरच्या कोपऱ्याला दुखापत झाली आणि त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली. तो ऑस्ट्रेलियात रवाना झाला होता आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी पुन्हा भारतात परतला आहे. कालच त्याने मुंबईच्या रस्त्यावर गल्ली क्रिकेटची मजा लुटली. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने २०१६ साली आयपीएल जेतेपद पटकावले होते आणि आता दिल्लीसाठी तसाच करिष्मा त्याच्याकडून अपेक्षित आहे. 


दिल्ली कॅपटिल्स -  अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर, ललित यादव, खलील अहमद, लुंगी एनगिडी, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, एम रहमान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, सर्फराज खान, प्रविण दुबे, यश धुल, मिचेल मार्श, विकी ओत्स्वाल, रिपल पटेल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनिष पांडे, रिली रोसोवू.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Here comes an announcement by Delhi Capitals: David Warner named captain, Axar Patel vice-captain, Sourav Ganguly named the director of cricket.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.