IPL 2023, DC Captain : भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याला अपघातामुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या पर्वात ( IPL 2023) तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार नसल्याचे आधीच स्पष्ट केला. त्यामुळे आयपीएल २०२३मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श आदी नावं या शर्यतीत आघाडीवर होते आणि अखेर कर्णधार कोण हे निश्चित झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या वर्षात संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्याकडे सोपवण्याचा निर्णय जाहीर केला.
ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) हा रिषभच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आहे. अक्षर पटेलकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत वॉर्नरच्या कोपऱ्याला दुखापत झाली आणि त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली. तो ऑस्ट्रेलियात रवाना झाला होता आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी पुन्हा भारतात परतला आहे. कालच त्याने मुंबईच्या रस्त्यावर गल्ली क्रिकेटची मजा लुटली. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने २०१६ साली आयपीएल जेतेपद पटकावले होते आणि आता दिल्लीसाठी तसाच करिष्मा त्याच्याकडून अपेक्षित आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"