Team India’s upcoming schedule : भारतीय संघाला BCCI पुन्हा दमवणार; पुढच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी खेळाडूंचा प्रचंड घाम काढणार!

Team India’s upcoming schedule after T20 World Cup 2021 exit : भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून रिकाम्या हाती माघारी परतावे लागले. वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीवर बोलताना जसप्रीत बुमराह, भरत अरूण आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून व्यग्र वेळापत्रकाचा वारंवार उल्लेख झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 02:59 PM2021-11-09T14:59:55+5:302021-11-09T15:00:43+5:30

whatsapp join usJoin us
Here is Team India’s Upcoming Schedule After Premature Exit From T20 World Cup 2021; India will play 8 Tests, 9 ODIs and 21 T20Is across six series  | Team India’s upcoming schedule : भारतीय संघाला BCCI पुन्हा दमवणार; पुढच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी खेळाडूंचा प्रचंड घाम काढणार!

Team India’s upcoming schedule : भारतीय संघाला BCCI पुन्हा दमवणार; पुढच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी खेळाडूंचा प्रचंड घाम काढणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India’s upcoming schedule after T20 World Cup 2021 exit : भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून रिकाम्या हाती माघारी परतावे लागले. जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याच्या बतावण्या निरुपयोगी ठरल्या आणि २०१२नंतर प्रथमच टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडले. पाकिस्तान व न्यूझीलंड विरुद्धचा पराभव टीम इंडियाला महाग पडला. वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीवर बोलताना जसप्रीत बुमराह, भरत अरूण आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून व्यग्र वेळापत्रकाचा वारंवार उल्लेख झाला. मागील सहा महिने खेळाडू बायो बबलमध्ये आहेत आणि त्यामुळे ते मानसिक व शारीरिकरित्या थकले असल्याचे शास्त्री यांनी सांगितले. त्यात आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा आणि वर्ल्ड कप यांच्यात गॅपच नव्हती. या सर्व गोष्टींवर बीसीसीआय व आयसीसीनं विचार करावा अशी विनंती शास्त्री यांनी केली. पण, तुम्ही टीम इंडियाचे  दौरे पाहिलेत तर पुढील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत खेळाडूंची दमछाक होणार हे निश्चित आहे.

नोव्हेंबर २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत भारतीय संघ सहा मालिकांमध्ये ( चार घरच्या मैदानावर व दोन परदेशात) ६ कसोटी, ९ वन डे आणि २१ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. त्याशिवाय आयपीएल २०२२चे ७४ सामने आहेतच. भारतीय संघ न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांचा पाहुणचार करणार आहे. तर  इंग्लंड व आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील सर्व कसोटी सामने हे जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि वन डे सामने हे आयसीसी वन डे सुपर लीग याचा भाग असणार आहेत.  

(भारतीय संघाचं पुढील वर्षभराचं वेळापत्रक एका क्लिकवर

India vs New Zealand Schedule 2021
 पहिला ट्वेंटी-२०- १८ नोव्हेंबर, २०२१,  जयपूर
 दूसरा ट्वेंटी-२० -  १९  नोव्हेंबर, २०२१,  रांची
तिसरा ट्वेंटी-२० -  २१ नोव्हेंबर, २०२१, कोलकाता
पहिली कसोटी - २५ ते २९ नोव्हेंबर, कानपूर
दुसरी कसोटी - ३ ते ७ डिसेंबर, मुंबई
 
South Africa vs India 2021-22 Schedule
पहिली कसोटी - १७ ते २१ डिसेंबर, जोहान्सबर्ग
दुसरी कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, सेंच्युरियन
तिसरी कसोटी- ३ ते ७ जानेवारी, २०२२, केप टाऊन 

पहिली वन डे - ११ जानेवारी, पार्ल
दुसरी वन डे - १४ जानेवारी, केप टाऊन
तिसरी वन डे - १६ जानेवारी, केप टाऊन 

पहिली ट्वेंटी-२० - १९ जानेवारी, केप टाऊन
दुसरी ट्वेंटी-२० - २१ जानेवारी, केप टाऊन
तिसरी ट्वेंटी-२० - २३ जानेवारी, केपा टाऊन  
चौथी ट्वेंटी-२० - २६ जानेवारी, पार्ल 

India vs West Indies 2022 Schedule
पहिली वन डे - ६ फेब्रुवारी, अहमदाबाद
दुसरी वन डे - ९ फेब्रुवारी, जयपूर
तिसरी वन डे - १२ फेब्रुवारी, कोलकाता

पहिली ट्वेंटी-२० - १५ फेब्रुवारी, कटक
दुसरी ट्वेंटी-२० - १८ फेब्रुवारी, विशाखापट्टणम
तिसरी ट्वेंटी-२० - २० फेब्रुवारी, त्रिवेंद्रम
 
India vs Sri Lanka 2022 Schedule
पहिली कसोटी - २५ फेब्रुवारी ते १ मार्च, बंगलोर
दुसरी कसोटी - ५ ते ९ मार्च, मोहाली

पहिली ट्वेंटी-२० - १३ मार्च, मोहाली
दुसरी ट्वेंटी-२० - १५ मार्च, धर्मशाला
तिसरी ट्वेंटी-२० - १८ मार्च, लखनौ  

आयपीएल २०२२ ( एप्रिले ते मे २०२२)  

India vs South Africa 2022 schedule
पहिली ट्वेंटी-२० - ९ जून, चेन्नई
दुसरी ट्वेंटी-२० - १२ जून, बंगलोर
तिसरी ट्वेंटी-२० - १४ जून, नागपूर
चौथी ट्वेंटी-२० - १७ जून, राजकोट
पाचवी ट्वेंटी-२० - १९ जून, दिल्ली
 
England vs India 2022 Schedule

स्थगित झालेली पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन
 ट्वेंटी-२० मालिका 
पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल
दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन
तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज

वन डे मालिका 
पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल
दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड 

Web Title: Here is Team India’s Upcoming Schedule After Premature Exit From T20 World Cup 2021; India will play 8 Tests, 9 ODIs and 21 T20Is across six series 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.