Join us  

Team India’s upcoming schedule : भारतीय संघाला BCCI पुन्हा दमवणार; पुढच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी खेळाडूंचा प्रचंड घाम काढणार!

Team India’s upcoming schedule after T20 World Cup 2021 exit : भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून रिकाम्या हाती माघारी परतावे लागले. वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीवर बोलताना जसप्रीत बुमराह, भरत अरूण आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून व्यग्र वेळापत्रकाचा वारंवार उल्लेख झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 2:59 PM

Open in App

Team India’s upcoming schedule after T20 World Cup 2021 exit : भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून रिकाम्या हाती माघारी परतावे लागले. जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याच्या बतावण्या निरुपयोगी ठरल्या आणि २०१२नंतर प्रथमच टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडले. पाकिस्तान व न्यूझीलंड विरुद्धचा पराभव टीम इंडियाला महाग पडला. वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीवर बोलताना जसप्रीत बुमराह, भरत अरूण आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून व्यग्र वेळापत्रकाचा वारंवार उल्लेख झाला. मागील सहा महिने खेळाडू बायो बबलमध्ये आहेत आणि त्यामुळे ते मानसिक व शारीरिकरित्या थकले असल्याचे शास्त्री यांनी सांगितले. त्यात आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा आणि वर्ल्ड कप यांच्यात गॅपच नव्हती. या सर्व गोष्टींवर बीसीसीआय व आयसीसीनं विचार करावा अशी विनंती शास्त्री यांनी केली. पण, तुम्ही टीम इंडियाचे  दौरे पाहिलेत तर पुढील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत खेळाडूंची दमछाक होणार हे निश्चित आहे.

नोव्हेंबर २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत भारतीय संघ सहा मालिकांमध्ये ( चार घरच्या मैदानावर व दोन परदेशात) ६ कसोटी, ९ वन डे आणि २१ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. त्याशिवाय आयपीएल २०२२चे ७४ सामने आहेतच. भारतीय संघ न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांचा पाहुणचार करणार आहे. तर  इंग्लंड व आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील सर्व कसोटी सामने हे जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि वन डे सामने हे आयसीसी वन डे सुपर लीग याचा भाग असणार आहेत.  

(भारतीय संघाचं पुढील वर्षभराचं वेळापत्रक एका क्लिकवर

India vs New Zealand Schedule 2021 पहिला ट्वेंटी-२०- १८ नोव्हेंबर, २०२१,  जयपूर दूसरा ट्वेंटी-२० -  १९  नोव्हेंबर, २०२१,  रांचीतिसरा ट्वेंटी-२० -  २१ नोव्हेंबर, २०२१, कोलकातापहिली कसोटी - २५ ते २९ नोव्हेंबर, कानपूरदुसरी कसोटी - ३ ते ७ डिसेंबर, मुंबई South Africa vs India 2021-22 Scheduleपहिली कसोटी - १७ ते २१ डिसेंबर, जोहान्सबर्गदुसरी कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, सेंच्युरियनतिसरी कसोटी- ३ ते ७ जानेवारी, २०२२, केप टाऊन 

पहिली वन डे - ११ जानेवारी, पार्लदुसरी वन डे - १४ जानेवारी, केप टाऊनतिसरी वन डे - १६ जानेवारी, केप टाऊन 

पहिली ट्वेंटी-२० - १९ जानेवारी, केप टाऊनदुसरी ट्वेंटी-२० - २१ जानेवारी, केप टाऊनतिसरी ट्वेंटी-२० - २३ जानेवारी, केपा टाऊन  चौथी ट्वेंटी-२० - २६ जानेवारी, पार्ल 

India vs West Indies 2022 Scheduleपहिली वन डे - ६ फेब्रुवारी, अहमदाबाददुसरी वन डे - ९ फेब्रुवारी, जयपूरतिसरी वन डे - १२ फेब्रुवारी, कोलकाता

पहिली ट्वेंटी-२० - १५ फेब्रुवारी, कटकदुसरी ट्वेंटी-२० - १८ फेब्रुवारी, विशाखापट्टणमतिसरी ट्वेंटी-२० - २० फेब्रुवारी, त्रिवेंद्रम India vs Sri Lanka 2022 Scheduleपहिली कसोटी - २५ फेब्रुवारी ते १ मार्च, बंगलोरदुसरी कसोटी - ५ ते ९ मार्च, मोहाली

पहिली ट्वेंटी-२० - १३ मार्च, मोहालीदुसरी ट्वेंटी-२० - १५ मार्च, धर्मशालातिसरी ट्वेंटी-२० - १८ मार्च, लखनौ  

आयपीएल २०२२ ( एप्रिले ते मे २०२२)  

India vs South Africa 2022 scheduleपहिली ट्वेंटी-२० - ९ जून, चेन्नईदुसरी ट्वेंटी-२० - १२ जून, बंगलोरतिसरी ट्वेंटी-२० - १४ जून, नागपूरचौथी ट्वेंटी-२० - १७ जून, राजकोटपाचवी ट्वेंटी-२० - १९ जून, दिल्ली England vs India 2022 Schedule

स्थगित झालेली पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन ट्वेंटी-२० मालिका पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉलदुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टनतिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज

वन डे मालिका पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हलदुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्सतिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारत विरुद्ध न्यूझीलंडभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App