भारताचा आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव ( Kedar Jadhav) यानं कारकिर्दीत नव्या प्रवासाला सुरूवात केली. १४ मार्च २०२१ मध्ये त्यानं कोथरूड येथे स्वतःच्या क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या २०२०मध्ये झालेल्या ऑकलंड येथील वन डे सामन्यात त्यानं शेवटचं टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) त्याला रिलीज केलं. प्रत्यक्ष ऑक्शनमध्ये त्याच्यावर पहिल्या फेरीत कोणीच बोली लावली नाही, परंतु सनरायझर्स हैदराबादनं ( Sunrisers Hyderabad) त्याला २ कोटींच्या बेस प्राइजमध्ये आपल्या ताफ्यात करून घेतले. ( Kedar Jadhav Opens Cricket Academy In Pune)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Kedar Jadhav Cricket Academy : पुण्यातील क्रिकेट टॅलेंट शोधण्यासाठी केदार जाधवनं सुरू केली अकादमी!
Kedar Jadhav Cricket Academy : पुण्यातील क्रिकेट टॅलेंट शोधण्यासाठी केदार जाधवनं सुरू केली अकादमी!
Kedar Jadhav Opens Cricket Academy In Pune भारताचा आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव ( Kedar Jadhav) यानं कारकिर्दीत नव्या प्रवासाला सुरूवात केली.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 1:50 PM