नवी दिल्ली : लवकरच लीजेंड लीग क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध जग असा सामना होणार आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हर्शल गिब्स भारताविरूद्धच्या सलामीच्या सामन्याला मुकणार आहे. पाकिस्तानमधील काश्मीर प्रीमियर लीगमध्ये खेळल्यामुळे गिब्जच्या जागेवर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनला संधी देण्यात आली आहे. माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने १६ सप्टेंबरला India Maharajas Vs World Giants असा सामना रंगणार आहे.
दरम्यान, लीजेंड्स लीग क्रिकेट (LLC) लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. सहा शहरांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे. या लीगमधील इंडियन महाराजा व वर्ल्ड जायंट्स या दोन संघांतील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तब्बल १० देशातील खेळाडू या लीगमध्ये सहभागी होणार आहेत. राहिलेल्या ४ फ्रँचायझींची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. या हंगामात एकूण १५ सामने खेळवले जाणार आहे.
BCCI ला केले होते ट्रोल
गिब्सने बोर्डावर केला होता आरोपकश्मीर प्रीमियर लीग या पाकिस्तानातील लीगमध्ये खेळू दिले जात नसल्याचा आरोप गिब्सने बीसीसीआयवर केला होता. याशिवाय बीसीसीआय राजकारण आणि क्रिकेट यांची सांगड घालत धमकावत असल्याचा आरोपही त्याने केला होता. त्यामुळे भारतीयांमध्ये नाराजीचा सूर पसरला आणि अखेर गिब्सला पहिल्या सामन्यातून पायउतार व्हावे लागले.
इंडियन महाराजा संघ - सौरव गांगुल ( कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंथ, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आर पी सिंग, जोगिंदर सिंग, रितिंदर सिंग सोढी.
रेस्ट ऑफ वर्ल्ड - इयॉन मॉर्गन ( कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्यलम, जाँटी ऱ्होड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसकात्झा,मश्रफे मोर्ताझा, असघर अफघान, मिचेल जॉन्सन, ब्रेट लीग, केव्हिन ओब्रायन, दिनेश रामदीन.