तो येतोय! इंग्लंडविरुद्ध तिसरी लढत आज रंगणार

विराट कोहली अँड कंपनीने दुसऱ्या लढतीत खेळाच्या प्रत्येक विभागात सरस कामगिरी केली. ईशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणात आक्रमक अर्धशतक ठोकत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:52 AM2021-03-16T03:52:10+5:302021-03-16T06:54:52+5:30

whatsapp join usJoin us
He's coming! The third match against England will be played today | तो येतोय! इंग्लंडविरुद्ध तिसरी लढत आज रंगणार

तो येतोय! इंग्लंडविरुद्ध तिसरी लढत आज रंगणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद : दुसऱ्या लढतीत शानदार विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघ मंगळवारी इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात आक्रमक खेळ करण्यावर भर देईल. (He's coming! The third match against England will be played today)

विराट कोहली अँड कंपनीने दुसऱ्या लढतीत खेळाच्या प्रत्येक विभागात सरस कामगिरी केली. ईशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणात आक्रमक अर्धशतक ठोकत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अनुभवी सलामीवीर लोकेश राहुल पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतरही किशनने दडपण न घेता जोफ्रा आर्चरच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत भारताचा निर्धार स्पष्ट केला. या व्यतिरिक्त गेल्या पाच डावांपैकी तीनमध्ये खाते उघडण्यात अपयशी ठरलेला कर्णधार कोहलीला सूर गवसल्यामुळे यजमान संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. 

गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. हार्दिक पांड्याने प्रदीर्घ कालावधीनंतर चार षटके मारा केला. त्यामुळे भारताला अतिरिक्त फलंदाजासह खेळण्याचा पर्याय उपलब्ध झाला.  भारताला ऋषभ पंतकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. त्याला श्रेयस अय्यरपूर्वी चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली. तो दोन्ही सामन्यांत चांगल्या सुरुवातीनंतर अपयशी ठरला. भारतीय संघ विजयी संघात बदल करणार नाही, पण नियमित सलामीवीर रोहित शर्मा विश्रांतीनंतर पुनरागमन करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत राहुलला संघाबाहेर जावे लागेल.  

दुसरीकडे, दुखापतग्रस्त मार्क वुडच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा मारा प्रभावी भासला नाही. कर्णधार इयॉन मोर्गनने मात्र तो पुढील सामन्यात खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सलामीवीर जेसन रॉय दोन्ही सामन्यात फॉर्मात दिसला, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. मंगळवारी तो शानदार खेळ करण्याचा प्रयत्न करेल. 

उत्सुकता ‘हिटमॅन’ची!
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सर्वांचे लागले आहे ती हिटमॅन रोहित शर्माच्या पुनरागमनाकडे. पहिल्या दोन सामन्यांत रोहितला विश्रांती देण्यात आल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याचे पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे. 

पहिल्या दोन्ही सामन्यांत लोकेश राहुल अपयशी ठरला. शिवाय अनुभवी शिखर धवनला पहिल्या सामन्यात संधी दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात संघाबाहेर बसविण्यात आले. अशा परिस्थितीत युवा ईशान किशनने संधी साधताना तडाखेबंद अर्धशतक झळकावले. 

त्यामुळेच रोहित आणि ईशान अशी सलामी जोडी तिसऱ्या सामन्यात पाहण्यास मिळू शकते. शिवाय दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असल्याने ही जोडी नक्कीच यशस्वी ठरेल, असा विश्वासही चाहते व्यक्त करत आहेत. 

प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया, ईशान किशन.
इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशिद, रीस टॉपले, क्रिस जोर्डन, मार्क वुड, सॅम कुरेन, टॉम कुरेन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टो आणि जोफ्रा आर्चर.

..तर रोहित राहणार बाहेर! 
रोहितने नेट्समध्ये कसून सराव केला. त्याने अनेक प्रकारचे फटके खेळले . त्याच्यासह धवन आणि राहुल यांनीही नेट्समध्ये घाम गाळला. राहुलला दोन सामन्यांत मिळून केवळ एकच धावा काढता आली. त्यामुळे त्याच्यावर दडपण आहे. शिवाय धवनलाही पहिल्या सामन्यात फारशी छाप पाडता आली नव्हती. रोहितने नेट्समध्ये  फारवेळ फलंदाजी केली. त्यामुळे त्याचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाने राहुलला फॉर्म मिळवण्याची आणखी एक संधी देण्याचे ठरविले तर मात्र रोहितला पुन्हा एकदा बेंचवर बसावे लागेल.
 

Web Title: He's coming! The third match against England will be played today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.