सचिन तेंडुलकर कुणाच्या तरी शोधात, कोण आहे 'ती' व्यक्ती?

या व्यक्तीमुळे तेंडुलकरच्या आयुष्याला मिळाली होती कलाटणी, आता ती आहे बेपत्ता...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 12:29 PM2019-12-14T12:29:38+5:302019-12-14T12:30:53+5:30

whatsapp join usJoin us
Hey netizens, can you help me find him?, Sachin Tendulkar apeal netizens | सचिन तेंडुलकर कुणाच्या तरी शोधात, कोण आहे 'ती' व्यक्ती?

सचिन तेंडुलकर कुणाच्या तरी शोधात, कोण आहे 'ती' व्यक्ती?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देजगात कोणालाही माहित नसलेलं गुपित त्या व्यक्तीनं केवळ निरिक्षणावर जाणून घेतलं होतंत्याच्या या निरिक्षणानंतर तेंडुलकरच्या कारकिर्दीला मोठ वळण मिळालं

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर निवृत्त होऊन सहा वर्ष झाली, परंतु आजही त्याची जादू क्रिकेटप्रेमींच्या मनात कायम आहे. तेंडुलकरनं भारतीयांना क्रिकेटवर जीवापाड प्रेम करायला शिकवलं. त्यामुळेच आजही तेंडुलकरची ओळख 'क्रिकेटचा देव' म्हणून कायम आहे. तेंडुलकरच्या प्रत्येक हालचालींवर, प्रत्येक ट्विटवर साऱ्यांचे लक्ष असते. शनिवारी क्रिकेटच्या देवानं नेटीझन्सना साद घातली. तेंडुलकर कोणत्यातरी व्यक्तीच्या शोधात आहे आणि ती व्यक्ती शोधून देण्यासाठी तेंडुलकरनं नेटीझन्सकडे मदत मागितली आहे. कोण आहे ती व्यक्ती आणि तेंडुलकर का आहे तिच्या शोधात?

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा असे अनेक विक्रम आजही तेंडुलकरच्या नावावर आहेत. तेंडुलकरनं 200 कसोटी सामन्यांत 51 शतकं व 68 अर्धशतकांच्या जोरावर 15921 धावा केल्या आहेत. 463 वन डे सामन्यांत त्यानं 44.83च्या सरासरीनं 49 शतकं आणि 96 अर्धशतकांसह 18426 धावा चोपल्या आहेत. शिवाय तेंडुलकरच्या नावावर कसोटी आणि वन डेत अनुक्रमे 46 व 154 विकेट्स आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तेंडुलकरनं शनिवारी एक किस्सा सांगितला आणि त्यातूनच त्यानं नेटीझन्सना अपील केले आहे.

तेंडुलकरनं सांगितलं की,''मी एका हॉटेलमध्ये थांबलो होतो, तेव्हा मी कॉफीची ऑर्डर केली होती. तेव्हा एक वेटर कॉफी घेऊन रुममध्ये आला आणि त्यानं मला क्रिकेटविषयी बोलायचं आहे, तर बोलू का? असं विचारलं. तेव्हा मी होकार दिला. त्यानं मला सांगितलं की, सर जेव्हा तुम्ही आर्म गार्ड घालता तेव्हा तुमच्या बॅटीच्या रिफ्लेक्शनमध्ये बदल जाणवतो. यावर मी कधी जगात कोणाशी बोललो नव्हतो आणि ते केवळ मलाच माहित होतं. तो वेटर म्हणाला मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमची फलंदाजी मी पुन्हा पुन्हा पाहतो. तेव्हा मला हे जाणवलं. त्याच्या या निरिक्षणावर मी होकार दिला. त्यानंतर मी माझं एलबो गार्डच्या डिझाईनमध्ये बदल करून घेतला आणि त्याचा मला खूप फायदा झाला.''

याच वेटरला शोधण्यासाठी मदत करण्याचं आवाहन तेंडुलकरनं नेटीझन्सना केलं आहे. 


 

Web Title: Hey netizens, can you help me find him?, Sachin Tendulkar apeal netizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.