मुंबई : सध्याच्या घडीला क्रिकेट जगतामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतोय ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नच्या कॅपचा. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये भीषण आग लागली आहे. त्यासाठी वॉर्नने आपली ऑस्ट्रेलियाच्या संघाची मानाची ग्रीन कॅप लिलावासाठी उपलब्ध केली आहे. या टोपीच्या लिलावाला लागलेली बोली जर तुम्ही पाहिली तर तुम्ही चक्रावून जाल...
ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे प्राण्यांचे आणि झाडांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितून बाहेर पडण्यासाठी काही जणं थेट जंगलात दाखल झाले आहेत. काहींनी प्राण्यांचे प्राण वाचवायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांनी आगर विझवण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.
काही जण प्रत्यक्षात जाऊन मदत करत आहेत, तर काही आर्थिक स्वरुपातही मदत करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी मदत जाहीर केली आहे. पण वॉर्नने एक शक्कल लढवली आहे. वॉर्नने आपली मानाची कॅप लिलावात काढली आहे आणि चाहत्यांनीही या लिलावाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
वॉर्नच्या कॅपचा लिलाव हा शुक्रवारी १० जानेवारी संपणार आहे. जेव्हा वॉर्नच्या कॅपचा लिलाव सुरु झाला त्यानंतर फक्त दोन तासांतच २७५००० डॉलर एवढी बोली लावली आहे. आज, गुरुवारी या कॅप सर्वाधिक ५ लाख २० हजार ५०० डॉलर एवढी सर्वाधिक बोली लावली गेली आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक क्रिकेटमधील बोली असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी सर्वाधिक बोली ही सर डॉन ब्रॅडमन यांच्या कॅपली मिळाली होती. ब्रॅडमन यांच्या कॅपला ४ लाख २५ हजार डॉलर एवढी बोली मिळाली होती. पण हा विक्रम आता वॉर्नच्या कॅपने मोडला आहे.
भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकावर शिक्कामोर्तब धोनीच्या षटकाराने झाले होते. धोनीने ज्या बॅटने षटकार खेचला होता, त्या बॅटचाही काही दिवसांपूर्वी लिलाव झाला होता. धोनीच्या बॅटचा लिलाव जवळपास २ लाख ५० हजार डॉलरला झाला होता.