कोरोना व्हायरसमुळे देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा हा दोन हजाराच्या वर गेला असून महाराष्ट्रातील संख्या 450 पर्यंत पोहोचली आहे. त्यात मुंबईतील रुग्णांचा आकडा हा अधिक आहे. कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस हे रात्रंदिवस काम करत आहेत. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेनं एक उपक्रम सुरू केला आहे आणि त्याचे टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं कौतुक केलं आहे.
लॉकडाऊनच्या काळात चोवीस तास घरीच राहावे लागत असल्यानं आणि हाताला काम नसल्यानं अनेकांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहेत. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या काळात शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक संतुलन राखणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पण, ते सर्वांनाच जमेल असे नाही आणि अशा व्यक्तींसाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका आणि एमपॉवर यांनी हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. त्यात मानसिक संतुलन कसे राखावे याबाबत फ्री समुपदेशन केलं जात आहे.
अजिंक्य रहाणेंनं या पुढाकाराचं कौतुक केलं आहे. त्यानं पोस्ट केली की,''लॉकडाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ हे तितकेच महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि एमपॉवर यांनी मानसिक स्वास्थाशी झगडणाऱ्या लोकांना मोफत समुपदेशनासाठी एक हेल्पलाईन सुरु केली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवं.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
केव्हीन पीटरसन-विराट कोहलीची चर्चा सुरू असताना अनुष्कानं ऑर्डर सोडली अन्...
भारताच्या फिरकीपटूचे समाजकार्य, 350 गरीब कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉलवरून गांगुली, तेंडुलकर, कोहली, सेहवागशी संवाद साधणार