T20 World Cup 2024 - मार्कस स्टॉइनिस आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अनिश्चित स्थितीतून बाहेर काढले. ऑस्ट्रेलियाने ओमान विरुद्धची ही लढत ३९ धावांनी जिंकली. ऑस्ट्रेलियाने ५ बाद १६४ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात ओमानला २० षटकांत ९ बाद १२५ धावा करता आल्या. ओमानच्या गोलंदाजांनी चांगला मारा करून ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले होते. पण, स्टॉयनिसच्या फटकेबाजीने संघाला सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचवले. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर ( David Warner) सोबत मजेशीर किस्सा घडला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. ट्रॅव्हिस हेड ( १२ ), मिचेल मार्श ( १४) व ग्लेन मॅक्सवेल ( ०) हे तिघं पन्नास धावांवर तंबूत परतले. वॉर्नर दुसऱ्या बाजूने विकेट टिकवून होत आणि स्टॉयनिसने त्याला हातभार लावला. वॉर्नरने ५१ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५६ धावा केल्या. कलीमुल्लाहने १९व्या षटकात वॉर्नरला माघारी पाठवले. बाद झाल्यानंतर वॉर्नर ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला, परंतु तो ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममध्ये न जाता ओमानच्या ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला. हा व्हिडीओ पाहून सर्वांना हसू आवरेना झाले.
़
डेव्हिड वॉर्नरने आजच्या खेळीसह ट्वेंटी-२०त ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ३१५५ धावांचा विक्रम नावावर करताना आरोन फिंच ( २४६८) याला मागे टाकले. हा सामना पाहण्यासाठी फिंच उपस्थित होता आणि त्याने वॉर्नरचे कौतुक केले. या सामन्यात स्टॉयनिसने ३६ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६७ धावा केल्या आणि नंतर गोलंदाजीत १९ धावांत ३ विकेट्स घेऊन विजयात सिंहाचा वाटा उचलला.
Web Title: hilarious incident - David Warner Mistakenly Heads Towards Wrong Dressing Room After Fiery Send-off During T20 World Cup 2024, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.