नवी दिल्ली : एका महिन्यात तब्बल पाच सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारताची धावपटू हिमा दासचा पहिलाच व्हिडीओ प्रसारित झाला आहे. या व्हडीओमध्ये हिमा नेमकं म्हणाली तरी काय, ते जाणून घ्या...
हा पाहा खास व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये हिमाने देशवासियांचे धन्यवाद मानले आहेत. पण या पाच सुवर्णपदकांनी ती हुरळून गेलेली नाही. कारण ही पाच सुवर्णपदके म्हणजे सराव होता, आता मला विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकायची आहे, असे हिमाने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ प्रसारीत केला आहे.
सुवर्णकन्या हिमा दासचे केले सचिन तेंडुलकरने कौतुकफक्त 19 दिवसांमध्ये पाच सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिमा दासचे कौतुक मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले आहे. सचिनने आपल्या ट्विटरवर खास संदेश पाठवला आहे. या संदेशामध्ये सचिनने हिमावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.
सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, " युरोपमध्ये फक्त 19 दिवसांत तू पाच सुवर्णपदके पटकावली. तुझी ही कामगिरी युवा पिढीसाठी प्रेरणदायी आहे. भविष्यातील शर्यतींसाठी तुला शुभेच्छा."
हिमा दासची 'सुवर्ण'पंचमी! महिनाभरात पटकावले पाचवे सुवर्णपदक
ढिंग एक्स्प्रेस या नावाने प्रसिद्ध झालेली भारताची युवा धावपटू हिमा दास हिची सध्या सोनेरी दौड सुरू आहे. शनिवारी झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले. हे हिमा दास हिचे गेल्या महिनाभरातील पाचवे सुवर्णपदक ठरले आहे.
हिमा हिने ट्विटरवर एक फोटो शेअर करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. झेक प्रजासत्ताक येथे 400 मीटर शर्यत अव्वलस्थानी राहत पूर्ण केली. हिमा हिने 52.09 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. याआधी झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टबोर अॅथलेटिक्स मीट स्पर्धेत हिमाने २०० मीटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी केली. २३.२५ सेकंदाची वेळ देत तिने शानदार बाजी मारली होती.
हिमाची सुवर्ण कामगिरी
2 जुलैला पोजनान अॅथलेटिक्सग्रां. प्री. स्पर्धेत 200 मी. 23.65 सेकंदासह शर्यतीत सुवर्ण.
7 जुलैला कुटनो अॅथलेटिक्समीट स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत 23.97 सेकंदासह सुवर्ण.
13 जुलै झेक प्रजासत्ताकयेथे क्लांदो अॅथलेटिक्स 200 मीटर शर्यतीत 23.43 सेकंदासह सुवर्ण.
18 जुलै, झेक प्रजासत्ताकटबोर अॅथलेटिक्स मीट, २०० मीटर शर्यतीत २३.२५ सेकंदांसह सुवर्ण.
20 जुलै झेक प्रजासत्ताक नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. 400 मीटर शर्यतीत 52.09 सेकंदांसह सुवर्णपदक.