भारत आणि नेदरलँड्स यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना सुरू असताना BCCI चे सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी ऐतिहासिक निर्णय जाहीर केल. जय शाह यांच्या ट्विटनुसार आता भारतीय महिला क्रिकेटपटूंना पुरुषांइतकेच वेतन मिळणार आहे. न्यूझीलंडने तीन महिन्यांपूर्वी समान वेतन त्यांच्या महिला व पुरुष क्रिकेटपटूंसाठी जाहीर केले होते.
जय शाह यांनी ट्विट केले की, भेदभावाचा सामना करण्यासाठी BCCI चे पहिले पाऊल टाकले आहे आणि त्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन धोरण लागू करत आहोत. क्रिकेटमधील समानतेच्या नवीन युगात जात असताना पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल.
महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंप्रमाणेच मॅच फी दिली जाईल. कसोटीसाठी १५ लाख, वन डे साठी ६ लाख आणि ट्वेंटी-२० साठी ३ लाख) दिले जातील. समान वेतन ही आमच्या महिला क्रिकेटपटूंप्रती माझी बांधिलकी होती आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी सर्वोच्च परिषदेचे आभार मानतो. जय हिंद, असेही जय शाह यांनी ट्विट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Historic moment in Indian cricket: The BCCI announces equal match fees pay for both men's and women's cricketers of India.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.