Join us  

MS Dhoni ने संघाबाहेर केले, पठ्ठ्याने सलग ५ शतकं झळकावून उत्तर दिले; आज तर त्याने द्विशतक झळकावले

Vijay Hazare Trophy : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल २०२३) पुढील पर्वासाठी होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी नुकतीच सोपवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 11:29 AM

Open in App

Vijay Hazare Trophy : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल २०२३) पुढील पर्वासाठी होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी नुकतीच सोपवली. ड्वेन ब्राव्हो, केन विलियन्सम आदी मोठ्या खेळाडूंना फ्रँचायझींनी रिलीज केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यात काही युवा खेळाडूंनाही फ्रँचायझींनी रिलीज केले आणि त्यांची स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची धडपड सुरू झाली. चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) रिलीज केलेल्या नारायण जगदीसन ( Narayan Jagadeesan ) याने विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy ) ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने सलग पाच वन डे सामन्यांत शतकं झळकावताना एकप्रकारे कर्णधार MS Dhoniच्या निर्णयाला कामगिरीतून उत्तर दिले.

न्यूझीलंडला धक्का, केन विल्यमसनची तिसऱ्या लढतीतून माघार; पण स्फोटक फलंदाजाची एन्ट्री

 

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings ) 

  • रिलीज केलेले खेळाडू - ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिल्न्, हरी निशांथ, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसीफ,  नारायण जगदीसन  
  • पर्समध्ये शिल्लक रक्कम - २०.४५ कोटी
  • परदेशी खेळाडूंची रिक्त जागा - २
  • कायम राहिलेले खेळाडू - महेंद्रसिंग धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, शुभ्रांशू सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हणंगर्गेकर, ड्वेन प्रेटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीष पथिराना, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महीष थिक्साना   

 

तामीळनाडू संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जगदीसनने आज अरुणाचल प्रदेशविरुद्धही शतकी खेळी केली. त्याने या लढतीपूर्वी हरयाणा ( १२८ धावा), गोवा ( १६८ धावा), छत्तीसगड ( १०७ धावा) आणि आंध्र प्रदेश ( ११४* धावा) यांच्याविरुद्ध शतक झळकावले होते. विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात चार शतक झळकावण्याच्या विराट कोहली ( २००८-०९), पृथ्वी शॉ ( २०२०-२१) , ऋतुराज गायकवाड ( २०२१-२२) व देवदत्त पडिक्कल ( २०२०-२१) यांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली होती.  

अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात जगदीसनने ११४ चेंडूंत १९ चौकार व ९ षटकारांसह द्विशतक झळकावले. विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात पाच शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :विजय हजारे करंडकतामिळनाडूचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२२
Open in App