Aus vs WI 3rd ODI ( Marathi News ) - ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजवर ६.५ षटकांत विजय मिळवून इतिहास नोंदवला. वन डे क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा हा सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ २४.१ षटकांत ८६ धावांवर तंबूत परतला आणि ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य २ विकेट गमावून ६.५ षटकांत पार केले. त्यांनी ४३.१ षटक म्हणजेच २५९ चेंडू राखून हा सामना जिंकला. सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेल्या विजयात ऑस्ट्रेलियाचा आजचा विजय सातव्या क्रमांकावर येतो.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने ८६ धावा केल्या आणि त्यापैकी ३२ धावा या एलिक एथानाजे याने केल्या आहेत. रोस्टन चेस ( १२ ) व केसी कार्टी ( १०) यांना दुहेरी आकडा गाठता आला. ऑस्ट्रेलियाच्या झेव्हियर बार्टलेटने २१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. लान्स मॉरिस व अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सीन अबॉटने एक बळी टिपला. ऑस्ट्रेलियाकडून जॅक फ्रेझर-मॅकगर्कने १८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावा केल्या. जोश इंग्लिसने १६ चेंडूंत नाबाद ३५ धावा कुटल्या. आरोन फिंच ( २) व स्टीव्ह स्मिथ ( ६*) यांनीही योगदान दिले.
सर्वाधिक चेंडू राखून वन डे क्रिकेटमधील विजय...
- इंग्लंड - ८ विकेट्स व २७७ चेंडू राखून विजय ( ४६ धावांचे लक्ष्य १३.५ षटकांत ( ६० षटकं) पार वि. कॅनडा, १९७९)
- श्रीलंका - ९ विकेट्स व २७४ चेंडू राखून विजय ( ३९ धावांचे लक्ष्य ४.२ षटकांत ( ५० षटकं) पार वि. झिम्बाब्वे, २००१)
- श्रीलंका - ९ विकेट्स व २७२ चेंडू राखून विजय ( ३७ धावांचे लक्ष्य ४.४ षटकांत पार वि. कॅनेडा, २००३)
- नेपाळ - ८ विकेट्स व २६८ चेंडू राखून विजय ( ३६ धावांचे लक्ष्य ५.२ षटकांत पार वि. अमेरिका, २०२०)
- न्यूझीलंड - १० विकेट्स व २६४ चेंडू राखून विजय ( ९४ धावांचे लक्ष्य ६ षटकांत पार वि. बांगलादेश, २००७)
- भारत - १० विकेट्स व २६३ चेंडू राखून विजय ( ५१ धावांचे लक्ष्य ६.१ षटकांत पार वि. श्रीलंका, २०२३)
Web Title: HISTORY - Australia won their biggest win in the history of ODI Cricket in terms of ball remaining, Australia chased down 87 in 6.5 overs against West Indies, They won the ODI match with 43.1 overs remaining
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.