इतिहास घडला! ऑसींच्या लढतीपूर्वी अफगाणिस्तानची ऐतिहासिक झेप, पाकिस्तानची उडाली झोप 

अफगाणिस्तानने यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 02:46 PM2023-11-07T14:46:43+5:302023-11-07T14:47:02+5:30

whatsapp join usJoin us
History created, Afghanistan qualified for the first time for Champions Trophy 2025 set to be played in Pakistan | इतिहास घडला! ऑसींच्या लढतीपूर्वी अफगाणिस्तानची ऐतिहासिक झेप, पाकिस्तानची उडाली झोप 

इतिहास घडला! ऑसींच्या लढतीपूर्वी अफगाणिस्तानची ऐतिहासिक झेप, पाकिस्तानची उडाली झोप 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अफगाणिस्तानने यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली आहे. इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका यांना पराभवाचा धक्का देत त्यांनी स्वतःला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम ठेवले आहे. आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना त्यांच्या या ऐतिहासिक वाटचालीसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. पण, मुंबईवरील या लढतीपूर्वी अफगाणिस्तानने इतिहास घडवला आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी बांगलादेश-श्रीलंका सामना वादग्रस्त राहिला. पण, या सामन्यातील निकाल अफगाणिस्तानसाठी फायद्याचा ठरला. 


बांगलादेशने या सामन्यात श्रीलंकेवर सहज विजय मिळवला आणि त्याचा फायदा अफगाणिस्तानला झाला. अफगाणिस्तान संघ २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्ऱॉफी ( Champions Trophy 2025 ) स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. अफगाणिस्तान प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे. बांगलादेश व श्रीलंका या आशियाई संघांसह इंग्लंड व नेदरलँड्स यांचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आयसीसीच्या नियमानुसार वर्ल्ड कप स्पर्धेतील अव्वल ८ संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरणार आहे. 


पाकिस्तान यजमान असल्याने ते पात्र ठरले आहेत. त्यांच्याशिवाय अफगाणिस्तान, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांनी आपले स्थान पक्के केले आहे. दोन जागा अजून रिक्त आहेत आणि त्यासाठी इंग्लंड, नेदरलँड्स, श्रीलंका व बांगलादेश अजूनही शर्यतीत आहेत. 

अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र कसे ठरले?
हशमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाने यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली आहे. २०१५ व २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांना केवळ एका विजयावर समाधान मानावे लागले होते. पण, यंदा त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान, नेदरलँड्स, श्रीलंका व नेदरलँड्सला पराभतू करून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत.

अफगाणिस्तान ७ सामन्यांत ८ गुण व -०.३३० नेट रन रेटसह सहाव्या क्रमांकावर आहेत. आज त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू आहे, तर शेवटचा साखळी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. त्यांनी हे दोन्ही सामने जिंकल्यास १२ गुणांसह उपांत्य फेरीतील जागा पक्के करतील. दरम्यान ते गुणतालिकेत साखळी फेऱी अखेरीस अव्वल ८ मध्ये नक्की राहतील आणि त्यांचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील स्थान पक्के राहिल. 

Web Title: History created, Afghanistan qualified for the first time for Champions Trophy 2025 set to be played in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.