Join us  

History : भारतापाठोपाठ आणखी एका संघाचा वन डेत लाजीरवाणा पराभव; द. आफ्रिकेच्या फलंदाजाने २० चेंडूंत कुटल्या ९० धावा

भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने २३४ चेंडू व १० विकेट्स राखून पराभूत केले. भारताचा वन डे क्रिकेटमधील हा सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 8:31 PM

Open in App

भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने २३४ चेंडू व १० विकेट्स राखून पराभूत केले. भारताचा वन डे क्रिकेटमधील हा सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला. आता भारत-ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS) यांच्यातला निर्णायक सामना उद्या खेळवला जाणार आहे. पण, आज भारतासारखाच लाजीरवाणा पराभव वेस्ट इंडिजला पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिच क्लासेन ( Heinrich Klassen) याने वन डे क्रिकेटमधील त्याचे सर्वात जलद शतक झळकावले आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आफ्रिकेने आज दमदार खेळ करून दाखवला. वेस्ट इंडिजने ठेवलेल्या २६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचे ४ फलंदाज ११ षटकांच्या आत ८७ धावांवर तंबूत परतले होते. त्यावेळी क्लासेन मैदानावर आला अन् त्याने पुढील २० षटकांत निकाल लावून टाकला. क्लासेनने ५४ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि दक्षिण आफ्रिकेकडून वन डेतील हे चौथे वेगवान शतक ठरले. 

या विक्रमात एबी डिव्हिलियर्स ( ३१ चेंडू वि. वेस्ट इंडिज, २०१५), मार्क बाऊचर ( ४४ चेंडू वि. झिम्बाब्वे, २००६) आणि एबी डिव्हिलियर्स ( ५२ चेंडू वि. वेस्ट इंडिज, २०१५) हे आघाडीवर आहेत. क्लासेनने ६१ चेंडूंत नाबाद ११९ धावांची खेळी करताना १५ चौकार व ५ षटकार खेचले. मार्को येनसन याने ४३ धावा करून चांगली साथ दिली आणि आफ्रिकेने २९.३ षटकांत ६ बाद २५४ धावा करून विजय मिळवला. वन डे क्रिकेटमध्ये ३० पेक्षा कमी षटकांत २५०+ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणारा आफ्रिका हा पहिलाच देश ठरला. 

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ ४८.२ षटकांत २६० धावांत तंबूत परतला. ब्रेंडन किंगने ७२ चेंडूंत ११ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ७२ धावा केल्या. त्यानंतर निकोलस पूरन ( ३९) व जेसन होल्डर ( ३६) यांनी दमदार खेळ करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. मार्को येनसन, बीजॉर्न फॉर्च्युन व गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :द. आफ्रिकावेस्ट इंडिज
Open in App