- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
गेल्या आठवड्यात क्रिकेटशी संबंधित सर्वांत मोठी बातमी क्रिकेटच्या मैदानावरची नसून पाकिस्तानमधील निवडणुकीच्या संबंधित होती. इम्रान खान यांच्या पाकिस्तान ‘तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. सध्या तरी सरकार स्थापन झाले नसले तरी इम्रानकडे पाकिस्तानचे नेतृत्व असेल असे वातावरण आहे. इम्रानच्या या राजकीय यशामुळे संपूर्ण क्रिकेट जगताला उत्साहित केले आहे. इयान चॅपेल, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, ज्योएफ बायकॉट, इयान बिशप यांनी इम्रान यांना खास शुभेच्छा पाठविल्या. त्यांचे अभिनंदन केले. मी कपिलदेवचेही नाव घेणार. त्याने तर एक लेखही लिहिला आहे. एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला मोठा दर्जा मिळाल्याचेही कपिलने लेखात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून एखाद्या देशाचा प्रमुख बनण्याची ही दुसऱ्यांदा वेळ असेल. याआधी, एक आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू जॉर्ज बियायांना ही संधी मिळाली आहे. लायबेरिया हा एक छोटासा देश आहे. त्या देशाचे ते पहिल्यांदा पंतप्रधान बनले व त्यानंतर राष्ट्रपतीसुद्धा बनले. परंतु, क्रिकेटच्या इतिहासात एक आंतरराष्ट्रीय खेळाडू पंतप्रधानपदापर्यंत जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. प्रथम श्रेणी क्रिकेटमधून ४ खेळाडू पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत. त्यात नवाझ शरीफ यांचाही
समावेश आहे. ज्यांना इम्रान खान यांनी पराभूत केले.
मी बरेच टूर कव्हर केले आहेत, त्यामुळे इम्रान खान यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यांची भेट झाली आहे. त्यावरून मी सांगू शकतो की इम्रानमध्ये दोन-तीन गोष्टी अशा आहेत, ज्या त्यांना इथपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण ठरल्या. पहिली गोष्ट म्हणजे ते जेव्हा एखादी गोष्ट ठरवतात ती पूर्ण होईपर्यंत सोडत नाहीत. त्यांचा इरादा पक्का असतो. मला आठवतं, चार-पाच वर्षांपूर्वी एका सामन्यादरम्यान वसीम अक्रमसोबत समालोचन करताना मी वसीमला इम्रानबाबत विचारले होते, की २०१३ ची निवडणूक गमावल्यानंतर त्याचे भविष्य काय असेल? त्यावर वसीमने म्हटले की, जोपर्यंत इम्रान हे ९० वर्षांचे होत नाही तोपर्यंत ते काहीच सोडणार नाहीत. यावर इम्रान यांचा इरादा अटळ दिसतो. ते स्वत:ला मानसिकरीत्या तयार ठेवतात. एक प्लेबॉय, स्टार, हिरो अशी त्यांची इमेज अनेकांच्या लक्षात आहे; पण त्यांची मेहनत नाही. ते तासन्तास नेटमध्ये सराव करायचे. चेंडू स्विंग कसा करायचा, फलंदाजी कशी विकसित करायची यावर ते खूप मेहनत घ्यायचे. कारण त्या वेळी कपिलदेव, इम्रान खान, इयान चॅपेल यांच्यात सर्वांत चांगला अष्टपैलू कोण? अशी चर्चा रंगत होती. इम्रानमुळे वसीम अक्रम, वकार युनूससारखे खेळाडू पािकस्तान संघात आले. त्यानंतर ते विश्वचषकही जिंकले. २२ वर्षांपूर्वी एका माणसाने पक्ष सुरू केला, जो आजही केवळ इम्रान खान यांच्या चेहºयामुळेच ओळखला जातो.
भारतासोबत संबंध
भारताला माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखू शकेल, कारण मी भारतात जास्त टूर केले आहेत. मी बºयाच लोकांना ओळखतो, असे इम्रान यांनी मुलाखतीत म्हटले आहे. त्यावर भारतीय संबंधाबाबत त्यांची भूमिका कुठेतरी जाणवते. ते भारतीय चॅनेलवर क्रिकेट एक्सपर्ट म्हणूनही बºयाचदा दिसले आहेत. मी भारतात खेळलो आहे. मला तुम्ही एक बॉलिवूड खलनायक मात्र समजू नका, असेही ते म्हणतात. गेल्या १०-१२ महिन्यांत इम्रान यांनी खूप संबंध वाढवले होते. पाकिस्तानात सेनेनेसुद्धा त्यांना सपोर्ट केले. तर कशा प्रकारे इम्रान खान या परिस्थतीला हाताळतात, तसेच इम्रान खान पाकिस्तानच्या जनरलला कॅप्टन बनवणार की पाकिस्तानचे जनरल इम्रानला कॅप्टन बनवणार, हेपाहणेही औत्सुक्याचे ठरेल.
Web Title: History of Imran being the Prime Minister
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.