ICC World Cup Qualifiers 2023 : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्यी उर्वरित दोन संघांसाठी सुरू असलेल्या पत्रता स्पर्धेत सोमवारी ओमानने इतिहास रचला. वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडवर ऐकेकाळी भारी पडलेल्या आयर्लंडवर त्यांनी ५ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ओमानने २८२ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ४८.१ षटकांत पार करून अन्य संघांना धोक्याचा इशारा दिला आहे.
ओमानच्या गोलंदाजांनी सुरेख सुरुवात करताना आयर्लंडचे आघाडीचे तीन फलंदाज ६९ धावांवर माघारी पाठवले. हॅरी टेक्टर ( ५१) आणि जॉर्ज डॉक्रेल ( ९१*) यांच्या खेळीच्या जोरावर आयर्लंडने ७ बाद २८१ धावा उभ्या केल्या. ओमानच्या बिलाल खान व फय्याझ बट यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात ओमानकडून सलामीवीर कश्यप प्रजापतीने ७२ धावांची खेळी केली. त्याला अकिब इलिस (५२), कर्णधार झीशान मक्सूद ( ५९) आणि मोहम्मद नदीम ( ४६*) यांनी दमदार साथ दिली. ओमानने ४८.१ षटकांत ५ बाद २८४ धावा करून विजय मिळवला. या विजयासोबत त्यांनी ब गटात २ गुणांसह दुसरे स्थान पटकावले.
ब गटात श्रीलंका २ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. श्रीलंकेने आज दुबळ्या संयुक्त अरब अमिरातीवर १७५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. कुशल मेंडिस ( ७८), सदीरा समराविक्रमा ( ७३), पथुम निसंका ( ५७) व दिमुथ करुणारत्ने ( ५२) यांनी दमदार खेळ करताना श्रीलंकेला ६ बाद ३५५ धावा उभ्या करून दिल्या. चरिथ असलंकाने नाबाद ४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ओमानचा संघ ३९ षटकांत १८० धावांत तंबूत परतला. वनिंदू हसरंगाने ८-१-२४-६ असा अप्रतिम स्पेल टाकला.
Web Title: HISTORY: OMAN BEAT IRELAND, Oman chase down 282 runs against Ireland in World Cup Qualifiers & Sri Lanka won against UAE by 175 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.