एबी डिव्हिलियर्स
पहिले लक्ष्य १६ गुण पटकावण्याचे असणे, याबाबत जाणकारांची सहमती असेल. कारण याचा अर्थ तुमचे प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित होईल. त्यानंतर अव्वल दोन स्थानांसाठी भर देता येईल. आयपीएल २०२० ची वाटचाल समारोपाकडे होत असताना हे समीकरण पुन्हा एका योग्य असल्याचे सिद्ध होत आहे. चार संघ दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्सची स्थिती चांगली भासत आहे. या संघांना उर्वरित चार किंवा पाच सामन्यांपैकी दोन सामने जिंकावे लागतील. दुसऱ्या बाजूचा विचार करता अन्य चार संघ राजस्थान रॉयल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्स यांना दडपण जाणवण्यास सुरुवात झाली आहे. या संघांना बाद फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील.
साखळी फेरी पूर्णपणे संपली आहे, असे कुणी समजायला नको. आयपीएलचा इतिहास बघता संथ सुरुवात करणारे संघ निराशाजनक कामगिरीनंतर ज्यावेळी गरज भासते त्यावेळी मुसंडी मारतात आणि आगेकूच करतात. एवढेच नव्हे तर लय कायम राखत जेतेपदही पटकावतात. राजस्थान, पंजाब, हैदराबाद आणि चेन्नई हे संघही २०२० च्या आयपीएलमध्ये चॅम्पियन ठरू शकतात? नक्कीच, का नाही!
या स्पर्धेत प्रत्येक संघात स्टार खेळाडू आहेत. सहभागी आठ संघांमध्ये गुणतालिकेत दिसतो तेवढा फरक नाही. आरसीबीची कामगिरी चांगली होत आहे. आम्ही काही सामन्यात निसटता विजय मिळविला. टी-२० क्रिकेटमध्ये यश-अपयशाची रेषा फार लहान असते, याची कल्पना आहे. राजस्थानविरुद्धच्या लढतीचे उदाहरण घेतले तर ३५ षटके लढत त्यांच्या नियंत्रणात होती, पण आम्ही अखेरच्या षटकामध्ये आक्रमक खेळ करीत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. रविवारी स्पर्धेत दोन्ही सामने सुपर ओव्हरपर्यंत लांबले. आरसीबीच्या खेळाडूंना शांत राहून लक्ष्यावर नजर केंद्रित करणे आवश्यक आहे. बुधवारी कोलकाताला पराभूत करणे सोपे नाही आणि रविवारी चेन्नईविरुद्ध खडतर आव्हान राहील. पण, एका वेळी एकच सामना.
(टीसीएम)
Web Title: History of winning after a slow start
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.