IND vs NZ: द्विशतक ठोकून पण 3 सामने खेळला नाहीस?, रोहितचा प्रश्न अन् इशानचे भन्नाट उत्तर, पिकला एकच हशा

rohit sharma and ishan kishan: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 10:29 AM2023-01-19T10:29:18+5:302023-01-19T10:29:57+5:30

whatsapp join usJoin us
Hit a double century but didn't play 3 matches Watch the video of Ishaan Kishan's amazing answer to Rohit Sharma's question    | IND vs NZ: द्विशतक ठोकून पण 3 सामने खेळला नाहीस?, रोहितचा प्रश्न अन् इशानचे भन्नाट उत्तर, पिकला एकच हशा

IND vs NZ: द्विशतक ठोकून पण 3 सामने खेळला नाहीस?, रोहितचा प्रश्न अन् इशानचे भन्नाट उत्तर, पिकला एकच हशा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून विजयी सलामी दिली आहे. न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसव्हेलने एकतर्फी झुंज दिली मात्र, त्याला पराभव टाळता आला नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून शुबमन गिलने (Shubman Gill) विक्रमी खेळी केली. त्याने 149 चेंडूंत 19 चौकार व 9 षटकारांसह 208 धावांची खेळी केली आणि भारताची धावसंख्या 349 धावांपर्यंत पोहोचवली. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे 6 फलंदाज 131 धावांवर माघारी परतल्यानंतर भारत सहज विजय मिळवेल असाच अंदाज होता. पण, मायकेल ब्रेसव्हेल व मिचेल सँटनर यांनी 102 चेंडूंत 162 धावांची विक्रमी भागीदारी करताना यजमानांना अखेरपर्यंत टक्कर दिली. 

दरम्यान, ब्रेसव्हेलने विक्रमी शतक झळकावले, तर सँटनर अर्धशतक झळकावून माघारी परतला. मोहम्मद सिराजने मोक्याच्या क्षणी ही भागीदारी तोडली अन् सामन्यात रंगत आणली. हार्दिक पांड्याने 49 व्या षटकात 4 धावा देत भारताला विजयाचे स्वप्न दाखवले अन् शार्दूलने अखेरच्या षटकात ब्रेसवेलची विकेट घेत थरारक विजय पक्का केला. 

रोहितने इशानची घेतली फिरकी 
सामना पार पडल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी द्विशतकवीर शुबमन गिलचे अभिनंदन केले. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. रोहित शर्मानेइशान किशनसह आमच्या द्विशतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये प्रवेश केल्यानंतर शुबमन गिलचे अभिनंदन केले. अशातच रोहित शर्माने युवा इशान किशनची फिरकी घेतली. "इशान तू द्विशतक झळकावून देखील 3 सामने का खेळला नाही?", रोहितच्या या प्रश्नावर किशनने एक भन्नाट उत्तर देताच हशा पिकला. "भैय्या, तूच कर्णधार आहेस अन् तूच मला वगळलंस", अशा शब्दांत इशानने देखील रोहितची फिरकी घेतली.

खरं तर इशान किशनने अलीकडेच बांगलादेशच्या धरतीवर 210 धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्याने अवघ्या 126 चेंडूत द्विशतक झळकावून नवा इतिहास रचला. मात्र, नववर्षात मायदेशात झालेल्या श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेत इशान किशनला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. याचाच दाखला देत कर्णधार रोहित शर्माने इशानची फिरकी घेतली. 

भारताचे द्विशतकवीर खेळाडू

  1. सचिन तेंडुलकर - 200 नाबाद 
  2. वीरेंद्र सेहवाग - 219
  3. रोहित शर्मा - 209
  4. रोहित शर्मा - 264
  5. रोहित शर्मा - 208
  6. इशान किशन - 210
  7. शुबमन गिल - 208

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Hit a double century but didn't play 3 matches Watch the video of Ishaan Kishan's amazing answer to Rohit Sharma's question   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.