Join us  

Ind vs Aus: हिटमॅन इज बॅक! रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना

आयपीएलहून परतल्यानंतर रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती.

By मुकेश चव्हाण | Published: December 15, 2020 5:37 PM

Open in App

मुंबई: टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) याची घोषणा केली होती. यानंतर आज रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. रोहित हा मुंबईहून दुबईला जाणार आहे आणि दुबईवरुन तो थेट सिडनीला पोहोचणार आहे. त्यामुळे भारताच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. 

आयपीएलहून परतल्यानंतर रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करणे गरजेचे होते. आता बीसीसीआय रोहितला ऑस्ट्रेलियाला पाठवायचे की नाही याचा निर्णय घेणार आहे. रोहित १९ नोव्हेंबरला एनसीएला गेला होता. 

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दोन्ही संघात वनडे आणि टी-२० मालिका झाली आहे. या दोन्ही मालिकेत अनेकदा उप कर्णधार रोहित शर्माची कमी जाणवत होती. आता कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. 

ऑस्ट्रेलियाला गेला तरी क्वारंटाईन?

सूत्राने सांगितले, ‘जर ते प्रवास करणार असतील तर त्यांच्यासाठी विलगीकरणाचे नियम कडक असतील. कारण ते व्यावसायिक विमानाने प्रवास करतील. कठोर विलगीकरण म्हणजे त्यांना पूर्ण संघासोबत विलगीकरणाच्या १४ दिवसांच्या कालावधीत सराव करण्याची परवानगी राहणार नाही.’

आता केवळ क्रिकेट ऑस्ट्रेलियाच आपल्या सरकारची मनधरणी करीत त्यांना विलगीकरण कालावधीदरम्यान सरावाची परवानगी देऊ शकते. राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रविवारी म्हटले होते की, ‘हे दोन्ही खेळाडू जर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात दाखल झाले तरच ते कसोटी मालिकेत खेळू शकतील.’

कसोटी (टेस्ट) मालिका-

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेडदुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेडतिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनीचौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया