मुंबई : ज्याप्रकारे मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला (Chennai Superkings) लोळवले होते, ते पाहता रविवारी मुंबईकर राजस्थान रॉयल्सवरही (Rajasthan Royals) भारी पडणार, अशी खात्री होती. मात्र राजस्थानने जोरदार प्रयुत्तर देताना मुंबईला धक्कादायकरीत्या पराभूत केले. या दोन्ही सामन्यांत मुंबईला कमतरता भासली, ती कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्माची (Rohit Sharma). आजारी असल्याने तो या दोन्ही सामन्यात खेळू शकला नव्हता. मात्र आता लवकरच मैदानावर दिसेल, अशी माहिती मुंबई इंडियन्सकडून मिळाली आहे.
रविवारी राजस्थानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारुनही मुंबईला पराभवाचा धक्का बसला. हा सामना जिंकून मुंबईला प्ले आॅफ प्रवेश करण्याची नामी संधी होती. मात्र त्यांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागेल. आता हिटमॅन रोहित शर्माही पुनरागमन करणार असून मुंबईचा प्ले आॅफ प्रवेश फार दूर नसेल असा विश्वास चाहत्यांना आहे.
राजस्थानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर मुंबईचा स्टार सलामीवीर क्विंटन डीकॉक याने सांगितले की, ‘रोहितची तब्येत खूप लवकर सुधारत आहे. असे असले तरी त्याच्या पुनरागमनाबाबत आत्ताच काही ठामपणे सांगणे कठीण आहे. मात्र लवकरच तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल आणि मैदानावर खेळताना दिसेल.’
चेन्नईविरुद्ध संघाबाहेर राहिल्यानंतर राजस्थानविरुद्ध रोहित पुनरागमन करेल, अशी शक्यता होती. मात्र तो संघाबाहेरच राहीला. त्याच्या अनुपस्थितीमध्ये दोन्ही सामन्यांत मुंबईचे नेतृत्त्व किएरॉन पोलार्डने सांभाळले. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहित बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध पुनरागमन करु शकतो. त्याचवेळी, आगामी आॅस्टेÑलिया दौºयासाठी रोहित भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यासाठीच स्वत: बीसीसीआयही रोहितबाबत कोणतााही धोका पत्करण्यास तयार नसेल.
Web Title: ‘Hitman’ Rohit Sharma to return soon
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.