रोहित शर्माने 115 चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर फक्त 36 चेंडूत लगावलं द्विशतक 

मोहालीतील दुस-या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने द्विशतक ठोकलं आहे. रोहित शर्माने फक्त 153 चेंडूत नाबाद 208 धावा केल्या. विशेष म्हणजे रोहित शर्माने जेव्हा शतक लगावलं तेव्हा तो 115 चेंडू खेळला होता. पण यानंतर त्याने मैदानावर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आणि फक्त 36 चेंडूत पुढचं शतक पुर्ण केलं. 

By शिवराज यादव | Published: December 13, 2017 03:45 PM2017-12-13T15:45:21+5:302017-12-13T15:56:20+5:30

whatsapp join usJoin us
Hitman Rohit Sharma scored the fastest century in 115 balls, after scoring just 36 balls in two balls | रोहित शर्माने 115 चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर फक्त 36 चेंडूत लगावलं द्विशतक 

रोहित शर्माने 115 चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर फक्त 36 चेंडूत लगावलं द्विशतक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमोहालीतील दुस-या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने द्विशतक ठोकलंरोहित शर्माने फक्त 153 चेंडूत नाबाद 208 धावा केल्याविशेष म्हणजे रोहित शर्माने जेव्हा शतक लगावलं तेव्हा तो 115 चेंडू खेळला होता

मोहाली - पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांची एकामागोमाग एक विकेट काढणा-या श्रीलंकन गोलंदाजांची आज भारतीय संघाने यथेच्छ धुलाई केली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने तर अक्षरक्ष: श्रीलंकन गोलंदाजांची पिसंच काढली. मोहालीतील दुस-या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने द्विशतक ठोकलं आहे. रोहित शर्माने फक्त 153 चेंडूत नाबाद 208 धावा केल्या. विशेष म्हणजे रोहित शर्माने जेव्हा शतक लगावलं तेव्हा तो 115 चेंडू खेळला होता. पण यानंतर त्याने मैदानावर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आणि फक्त 36 चेंडूत पुढचं शतक पुर्ण केलं. 

रोहित शर्माचं एकदिवसीय सामन्यातील हे तिसरं द्विशतक ठरलं आहे. विशेष म्हणजे तीन द्विशतक ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याशिवाय भारतीय कर्णधाराने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. तसंच भारतीय संघाने मोहालीमधील सर्वोच्च 351 धावसंख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. भारताने तीन विकेट्स गमावत 392 धावा केल्या.

कर्णधारपदाच्या दुस-याच सामन्यात रोहित शर्माने द्विशतक ठोकलं आहे. फक्त 153 चेंडूत रोहितने 208 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 13 चौकार आणि 12 षटकार ठोकले. महत्वाचं म्हणजेच आजच रोहित शर्माच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मोहालीत सुरु असलेला हा सामना पाहण्यासाठी रोहितची पत्नी रितिका उपस्थित आहे. द्विशतक लगावत रोहित शर्मा पत्नी रितिकाला लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आहे. 13 डिसेंबर 2015 ला रोहित शर्मा गर्लफ्रेंण्ड रितिकासोबत लग्न बंधनात अडकला होता. मुंबईत हा लग्नसोहळा पार पडला होता. रोहितने शतक ठोकल्यानंतर पत्नी रितिकाला फ्लाईंग किस दिला. यावेळी रितिकालाही अश्रू अनावर झाले होते.


रोहित शर्मा याचाही साखरपुडा चांगलाच चर्चेत होता. कारण त्याने त्याचा साखरपुडा फिल्मी स्टाईलने केला होता. रोहितने त्याच्या वाढवदिवसाच्या २ दिवसांनंतर बोरीवलीच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये रितिकाला प्रपोज केलं होतं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांसमोरच रोहितने रितिकाला अंगठी घातली होती. रितिका ही मुंबईतच राहणारी असून दोघे ६ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. 

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी सपशेल फेल गेली होती. मात्र आजच्या सामन्यात भारतीय फंलदाजांनी चांगलाच वचपा काढला. सुरुवातीला शिखर धवन आणि नंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने अक्षरक्ष: गोलंदाजांना धुतलं. हिटमॅन रोहित शर्माने तुफान फलंदाजी करत आपलं तिसर द्विशतक साजरं केलं. शॉट मारेन तिथे सिक्स अशी परिस्थिती मैदानात झाली होती. श्रेयस अय्यरने 70 चेंडूत 88 धावा केल्या तर शिखर धवनने 67 चेंडूत 68 धावा ठोकल्या. रोहित शर्माच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने श्रीलंकेसमोर 393 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
 

Web Title: Hitman Rohit Sharma scored the fastest century in 115 balls, after scoring just 36 balls in two balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.