भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या फिल्ड बाहेरील वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी रितिका सजदेह हिने १५ नोव्हेंबरला बेबी बॉयला जन्म दिला. रोहित शर्मानं सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसऱ्यांदा बाबा झाल्याचा आनंद व्यक्त केल्याचेही पाहायला मिळाले. आता हिटमॅन आपल्या बाबांच्या बर्थ डे सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. रोहित शर्मानं मुंबईत आपल्या कुटुंबियातील सदस्यांसोबत वडिलांचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
दुसऱ्यांदा बाबा झाल्यावर पहिल्यांदाच स्पॉट झाला रोहित
सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय त्यात हिटमॅन रोहित शर्मा आपले वडील आणि कुटुंबियातील सदस्यांसोबत चर्चा करताना दिसून येते. या पार्टीत रोहित शर्मा पत्नी रितिका सजदेह आणि लेक समायराशिवाय सहभागी झाला होता. दुसऱ्यांदा डॅडी झाल्यावर बाबांचा बर्थडे साजरा करताना रोहित शर्माची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळालीये. रोहितच्या वडिलांच नाव गुरुनाथ शर्मा असं आहे. मुंबई इंडियन्सच्या फॅन पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, ते १७ नोव्हेंबरला बर्थडे साजरा करतात.
हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला कधी निघणार?
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरला पर्थच्या मैदानात रंगणार आहे. दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी रितिकासोबत वेळ घालवण्याचा निर्णय रोहितनं घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पहिल्या पर्थ कसोटीत भारतीय संघाला त्याच्याशिवायच मैदानात उतरावे लागणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. दुसऱ्या कसोटी सामन्याआधी रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, अशी अपेक्षा आहे. अद्याप त्यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन
रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून माघार घेतल्यावर त्यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. नॅशनल ड्युटीपेक्षा फॅमिलीला प्राधान्य दिल्यामुळे काहींना त्याच्यावर टीकाही केली. पण एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे रोहित शर्मा क्रिकेटच्या मैदानात उतरतो त्यावेळी रितिका सजदेह अन् त्याची लेक समायरा यांची झलक स्टेडियममध्ये दिसणार नाही, असे कधीच झाले नाही. हा सीन परफेक्ट फॅमिली सीनची एक अर्धी झलक होता. यावेळी रोहितनं दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी पत्नीच्या सोबत राहून परफेक्ट कपल गोल सेट केल्याचे दिसते. त्यानंतर आता बाबांचा बर्थडे साजरा करून हिटमॅननं परफेक्ट फॅमिली मॅनचा सीन दाखवून दिला आहे.