नवी दिल्ली : भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना महिला प्रीमियर लीग २०२३ च्या लिलावात सर्वांत महागडी खेळाडू ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) मुंबई इंडियन्सला कडवी टक्कर देताना स्मृतीला ३.४० कोटींत आपल्या ताफ्यात घेतले.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमपेक्षास्मृती मानधनाला दुप्पट पगार मिळणार आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर सध्या पेशावर झल्मीकडून खेळतो आणि त्याला प्रत्येक हंगामात १.५० लाख डॉलर मिळतात, पाकिस्तानी रुपयानुसार ही रक्कम ३.६० कोटींच्या पुढे जाते; पण भारतीय रुपयात ही रक्कम मोजली तर ती १.५० कोटींपेक्षा कमी आहे. केवळ बाबरच नव्हे, तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी यांना पीएसएलमधून मिळणारा पगार २ कोटींपेक्षा कमीच आहे.