भारतीय खेळाडूंमधील संघ भावना हरवतेय; सचिन तेंडुलकरला चिंता, सौरव गांगुलीकडे विनंती

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं मंगळवारी भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली याच्याकडे एक विनंती केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 05:29 PM2019-11-26T17:29:00+5:302019-11-26T17:29:14+5:30

whatsapp join usJoin us
Hope BCCI chief Sourav Ganguly revamps Duleep Trophy as it lacks team spirit: Sachin Tendulkar | भारतीय खेळाडूंमधील संघ भावना हरवतेय; सचिन तेंडुलकरला चिंता, सौरव गांगुलीकडे विनंती

भारतीय खेळाडूंमधील संघ भावना हरवतेय; सचिन तेंडुलकरला चिंता, सौरव गांगुलीकडे विनंती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं मंगळवारी भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली याच्याकडे एक विनंती केली आहे. गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. गांगुलीच्या पुढाकारानं टीम इंडियानं प्रथमच आंतरराष्ट्रीय डे नाईट कसोटी सामना खेळला. पण, तेंडुलकरनं एक वेगळीच चिंता व्यक्त केली आहे आणि त्याकडे लक्ष घालण्याची विनंती त्यानं गांगुलीला केली आहे.


दुलीप चषक क्रिकेट स्पर्धेत सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत तेंडुलकरनं व्यक्त केलं. या स्पर्धेत खेळाडू सांघिक कामगिरीपेक्षा वैयक्तिक कामगिरीवर अधिक भर देताना पाहायला मिळत आहे आणि ही चिंतेची बाब असल्याचं तेंडुलकरनं म्हटलं. यामुळे खेळ भावना संपुष्टात येईल, अशी भीती त्यानं व्यक्त केली. पाच विभागांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सुधारणा करण्याची विनंती केली. तेंडुलकर म्हणाला,''गांगुलीनं गुलीप चषक स्पर्धेकडे लक्ष घालावे. या स्पर्धेत खेळाडू वैयक्तिक कामगिरीवर अधिक भर देतात.. येथे संघभावना दिसत नाही. हे सर्व आयपीएल लिलावासाठी किंवा आगामी ट्वेंटी-20/ वन डे स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून खेळ होते. त्यात संघाचा विचार होताना दिसत नाही.''


दुलीप चषक स्पर्धा पाच विभागीय संघांमध्ये खेळवली जाते, परंतु आता भारत ब्लू, भारत ग्रीन आणि भारत रेड अशा राऊंड रॉबीनमध्ये खेळवली जातात. येत्या रविवारी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यात तेंडुलकर हा मुद्दा मांडणार आहे. ''क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे त्यात संघभावना, एकजुटता आलीच. हा एकट्या व्यक्तिचा खेळ नाही,'' असे तेंडुलकर म्हणाला. 
 

तेंडुलकरनं सुचवला पर्याय
या स्पर्धेत रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश करणारे चार संघ आणि त्यात 19 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील प्रत्येकी एक संघही खेळवावा. 

Web Title: Hope BCCI chief Sourav Ganguly revamps Duleep Trophy as it lacks team spirit: Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.