नवी दिल्ली : वाढत्या वयामुळे स्थानिक क्रिकेटमध्ये सरस कामगिरी करूनही राष्ट्रीय संघात पुनरागमनाची गौतम गंभीरला फारशी अपेक्षा उरलेली नाही. पण या सलामीवीराने अद्यापही आशा सोडलेली नाही.भारतीय क्रिकेटमधील सर्वांत परिपूर्ण फलंदाजांपैकी एक असलेला गंभीर म्हणाला, ‘मी प्रेरणादायी खेळाडू आहे. ज्या दिवशी ही प्रेरणा संपेलत्या दिवशी निवृत्ती ठरली असेल.’ गंभीर दिल्ली संघातून नियमितरणजी सामने खेळत असून यंदा दहा वर्षानंतर या संघाने अंतिम फेरी गाठली. सध्या तो निवडकर्त्यांच्या यादीत नसला तरी त्याच्या उत्कृष्ट फॉर्मच्या बळावरच दिल्ली अंतिम फेरी गाठू शकला.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गंभीर म्हणाला, ‘मैदानावर जितकी चांगली कामगिरी करता येईलतितकी करा. धावा काढणे आपल्या हातात आहे. मी वर्षानुवर्षे हेच काम करीत आहे. ज्या दिवशी कामगिरी संपेल त्या दिवशी निवृत्त होईल.’ गंभीर सध्या ३६ वर्षांचा आहे.राष्टÑीय संघात त्याला पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. एकवेळ तिन्ही प्रकारांत संघाचा अविभाज्य खेळाडू असलेला डावखुरा गंभीर राष्टÑीय संघातून वगळल्याबद्दल जराही विचलित नाही. मी निवडकर्त्यांशी बोलत नाही. ते माझे काम नाही. मी केवळ धावा काढतो व हेच माझे काम असल्याचे मत गंभीरने व्यक्त केले. (वृत्तसंस्था)2008 मध्ये गंभीरच्याच नेतृत्वात दिल्लीने अंतिम फेरी गाठली होती. त्याने सध्याच्या मोसमात तीन शतके आणि दोन अर्धशतकांसह ६३२ धावा केल्या असून सर्वाधिक धावा काढणाºयांमध्ये तो आठव्या स्थानावर आहे. मागच्या वर्षी गंभीरने संघाच्या संचालनावरून कोच केपी भास्कर यांच्याशी हुज्जत घातली होती. त्यामुळे त्याला चार प्रथमश्रेणी सामन्यातून निलंबित करण्यात आले होते.याविषयी तो म्हणाला, ‘अखेर कोच किंवा सहयोगी स्टाफ कामात येत नाही. संघाची कामगिरीच महत्त्वाची ठरते. यंदाच्या सत्रातील यशासाठी कुणी एक खेळाडू नव्हे तर सांघिक कामगिरी कारणीभूत आहे.’ दिल्लीला सातत्याने रणजी करंडक जिंकणाºया कर्नाटक आणि मुंबईसारख्या संघाच्या पंक्तीत बसवायचे असल्याचे गंभीरने सांगितले.आगामी द. आफ्रिका दौºयाकडे निर्देश करीत गंभीरने नंबर वन असलेल्या भारतीय संघाने कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवायलाच हवा, असे मत नोंदविले. या दौºयात विराट अॅन्ड कंपनीची कठोर परीक्षा असेल, असे जाणकारांना वाटते. ५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या या दौºयात भारताची घसरगुंडी झाल्यास संघाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लागेल.द. आफ्रिकेला त्यांच्या मैदानावर हरविण्यासाठी भारतीय संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीत सातत्य जपावे लागेल, असा सल्ला गंभीरने दिला. नंबर वन संघाने तर कुठल्याही स्थितीत जिंकायला हवे, यावर गंभीरचा भर होता.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- निवृत्त होणार नाही...राष्ट्रीय संघात पुनरागमनाची आशा कायम : गौतम गंभीर
निवृत्त होणार नाही...राष्ट्रीय संघात पुनरागमनाची आशा कायम : गौतम गंभीर
वाढत्या वयामुळे स्थानिक क्रिकेटमध्ये सरस कामगिरी करूनही राष्ट्रीय संघात पुनरागमनाची गौतम गंभीरला फारशी अपेक्षा उरलेली नाही. पण या सलामीवीराने अद्यापही आशा सोडलेली नाही.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 2:05 AM