Join us  

Yuzvendra Chahal with Mumbai Indians : अँड्य्रू सायमंड्स व जेम्स फ्रँकलिन यांनी मद्यधुंद अवस्थेत युझवेंद्र चहलसोबत केलं लाजीरवाणं कृत्य; समोर आलं धक्कादायक सत्य

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या मेगा ऑक्शननंतर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या युझवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal Horrific Incident) मोठा गौप्यस्फोट केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 6:31 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या मेगा ऑक्शननंतर राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) संघाकडून खेळणाऱ्या युझवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal Horrific Incident) मोठा गौप्यस्फोट केला. मुंबई इंडियन्ससोबत असतानाचा हा किस्सा ऐकल्यानंतर क्रिकेटमधील लाजीरवाणा प्रकार पुन्हा समोर आला. मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने मद्यधुंद अवस्थेत चहलला १५व्या मजल्यावर लटकवले होते आणि तो मरता मरता वाचला होता. पण, त्याच्यासोबत त्यावेळी घडलेली ही एकमेव घटना नाही. चहलसोबत आणखी एकदा अशीच गैरवर्तवणुक झालेली होती. 

काही महिन्यांपूर्वी चहलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पॉडकास्टवर तो लाजीरवाणा प्रकार सांगितला होता. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू अँड्य्रू सायमंड्स  (Andrew Symonds) व  जेम्स फ्रँकलिन  (James Franklin) यांचे नाव घेऊन ही घटना सांगितली. या दोन्ही खेळाडूंनी चहलचे हात-पाय बांधले होते आणि तोंडावर टेप बांधून त्याला रात्रभर एका  खोलीत सोडले होते. तो म्हणाला,''२०११सालचा हा प्रसंग आहे. तेव्हा मी चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये जॅम्पियन्स लीग जिंकल्यानंतर थांबलो होतो. सायमंडने खूप फ्रूट ज्यूस ( दारू) प्यायली होती ( हसत हसत). त्यावेळी मीच त्याच्यासोबत होतो. त्यानंतर फ्रँकलिन व त्याने माझे हात-पाय बांधले व तोंडावर पट्टी बांधली. त्यांनी सांगितले की आता तुला स्वतःला यातून सुटका करायची आहे. ''

''ती दोघं एवढ्या मस्तीच्या मूडमध्ये होती की त्यांनी माझ्या तोंडावर टेप लावली आणि माझ्याबद्दल विसरलेही. पार्टी संपली आणि सकाळी जेव्हा सफाई कर्मचारी आला तेव्हा त्याने मला पाहिले व मला सोडवले,'' असेही तो म्हणाला.  

आयपीएल २०२२च्या ऑक्शनमध्ये ६.५ कोटींत चहलला राजस्थान रॉयल्सने करारबद्ध केले. आतापर्यंत त्याने ३ सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या आहेत आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. उमेश यादव ४ सामन्यांत ९ विकेट्ससह अव्वल स्थानी आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२२युजवेंद्र चहलमुंबई इंडियन्स
Open in App