Join us  

IPL 2023: तुझा आवडता क्रिकेटर कोण? Rashmika Mandanna , Tamannaah Bhatia म्हणतात...

Rashmika Mandanna Tamannaah Bhatia: आज दोघी अभिनेत्री IPLच्या उद्घाटन सोहळ्यात दाखवणार डान्सचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 1:58 PM

Open in App

Tamannaah Bhatia Rashmika Mandanna, IPL Opening Ceremony  भारतातील सर्वात लोकप्रिय IPL 2023 क्रिकेट लीग आजपासून सुरू होणार आहे. आज साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या दोन स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि तमन्ना भाटिया IPL च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये डान्स परफॉर्म करणार आहेत. नुकतेच ऑस्करमध्ये विजेते झालेले नाटू नाटू या गाण्यावर आज रश्मिका डान्स करणार आहे. क्रिकेटच्या या सोहळ्यातील उद्घाटन समारंभात रश्मिका आणि तमन्ना दोघीही परफॉर्म करताना दिसणार आहे. आयपीएल पेजवर त्यांची एक मुलाखत शेअर करण्यात आली. यावेळी त्यांनी आपले आवडते क्रिकेटपटू कोणते याबद्दल सांगितले. विशेष बाब म्हणजे, दोघींनीही दोन्ही क्रिकेटपटूंची नावे सारखीच घेतली.

--

IPL सीझन 16 मध्ये ग्रुप स्टेजचे सामने 21 मे पर्यंत खेळवले जातील. यानंतर प्लेऑफचे सामने होतील. या स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना 28 मे रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना यांना आयपीएलच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. आयपीएलच्या अधिकृत पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तिच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारले असता, रश्मिका मंदाना म्हणाली की तिला एमएस धोनी आणि विराट कोहली खूप आवडतात. तमन्ना भाटियानेही तिच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारले असता एमएस धोनी आणि विराट कोहलीचे नाव देखील घेतले.

तसेच त्या दोघींनी एकत्रितपणे सांगितले की, याआधी त्यांना कधीच मैदानातून क्रिकेट सामना पाहण्याची संधी मिळाली नव्हती. आज त्या दोघीही या परफॉरमन्सनंतर सामन्याचा आनंदही घेणार आहेत. IPL च्या उद्घाटन समारंभात तमन्ना भाटिया परफॉर्म करण्याची ही पहिलीच वेळ नाही, तिने यापूर्वीही या मंचावर परफॉर्म केले आहे. तमन्ना भाटिया रश्मिका मंदानासोबत, बॉलीवूड गायक अरिजित सिंग देखील उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२३तमन्ना भाटियारश्मिका मंदानामहेंद्रसिंग धोनीविराट कोहली
Open in App