Arjun Tendulkar Angry Reaction Video Goes Viral : क्रिकेटचा देव अशी उपमा लाभलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर वडिलांच्या पावलावर पाउल टाकतं क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये आपली विशेष छाप सोडण्यासाठी तो मेहनतही घेतोय. पण त्याला अद्याप म्हणावं तसं यश काही मिळालेले नाही. पण तरीही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.
अर्जुन तेंडुकर फिल्डबाहेरील गोष्टीमुळे आलाय चर्चेत
अर्जुन तेंडुलकर सोशल मीडियावर फारसा सक्रीय दिसत नाही. पण फॅन पेजवरून त्याची झलक पाहायला मिळतेच. आता अर्जुन तेंडुलकर फिल्डबाहेरील एका गोष्टीमुळे चर्चेत आलाय. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. ज्यात कुणी तरी अर्जुनला धक्का मारल्याचे दिसून येते. नेमकं काय घडलं? अर्जुन तेंडुलकरची यावेळी काय होती रिअॅक्शन जाणून घेऊयात व्हायरल व्हिडिओत दडलेली खास स्टोरी
गर्दीत अर्जुन तेंडुलकर 'दे धक्का सीन'मुळे झाला 'दर्दी', पण...
अर्जुन तेंडुलकर हा क्रिकेटमधील प्रस्थापित चेहरा नसला तरी सचिन तेंडुलकरमुळे तो नेहमी प्रकाशझोताच्या एका वेगळ्या वलयात असल्याचे दिसते. त्यात नवलंही काही नाही. आता अर्जुन तेंडुलकरचा जो व्हिडिओ समोर आलाय त्यात तो रात्री उशीरा आउटिंगला घराबाहेर पडल्याचे दिसते. दरम्यान त्याला एका व्यक्तीचा धक्का लागतो. यावर अर्जुन तेंडुलकरची प्रतिक्रिया अगदी बघण्याजोगी होती.
रस्तराँबाहेर घडला प्रकार, कशी होती अर्जुन तेंडुलकरची होती रिअॅक्शन?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अर्जुन तेंडुलकर एका रेस्तराँमध्ये जात असल्याचे दिसते. त्याच्या आजुबाजूला गर्दीही दिसून येते. ज्यावेळी तो रांगेतून आत एन्ट्री मारत असतो त्यावेळी पाठिमागून एका व्यक्तीचा त्याला धक्का लागतो. तू मला धक्का मारतोय का? असे काहीसे अर्जुन तेंडुलकर बोलतो. पण त्यानंतर पुन्हा लगेच त्याची कूल अंदाजातील झलकही पाहायला मिळते. तो स्माइल देत पुढे निघून जातो. अर्जुन तेंडुलकर हा देखील आपल्या वडिलांप्रमाणेच शांत स्वभावाचा आहे. या व्हिडिओमध्ये ते तीच गोष्ट दिसून आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यानं कूल अंदाजानं चाहत्यांची मनं जिंकल्याचे पाहायला मिळते.